
Dharashiv Rain
sakal
धाराशिव : जिल्ह्यातील सात मंडळांत रविवारी (ता.२८) सकाळपर्यंत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे वाशी, भूम, परंड्यासह तुळजापूर तालुक्यांना पुन्हा तडाखा बसला आहे. आधीच्या तडाख्यातून सावरत असताना पुन्हा पुन्हा अतिवृष्टीचा आघात सुरू असल्याने उरली-सुरली पिके, फळबागाही हातच्या गेल्या आहेत.