girja river water
sakal
फुलंब्री - फुलंब्री येथील महात्मा फुले मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. फुलंब्री येथील धरणात संचयित केलेले परिपक्व मासे मुसळधार पावसामुळे गिरजा नदीत वाहून गेल्याने संस्थेला तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. या घटनेमुळे मागासवर्गीय समाजातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांची उपजीविका धोक्यात आली असून शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे.