esakal | कलावंतांना सातासमुद्रापार राहूनही केली मदत; कुठे ते वाचा

बोलून बातमी शोधा

sarkas.jpg


ज्या-ज्या वेळी माझ्या मातृभूमीवर संकट येईल त्या त्या वेळी काही अंशी मातृभूमीची मदत करून मी मातृभूमीच्या कायम ऋणात राहणार असल्याची निखळ भावना ठेवून सदैव मदतीचे हात पुढे करणारा मूळ सोलापूर येथील रहिवासी असलेले व अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर कार्यरत असलेले मंदार जोशी यांनी मुखेड तालुक्यात या कोरोनामुळे अडकलेल्या चाळीस कलावंतांना लॉकडाउन उठेपर्यत त्यांना पुरेल एवढे अन्नधान्य उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासत इतरांसाठी आदर्श घालून दिला आहे.

कलावंतांना सातासमुद्रापार राहूनही केली मदत; कुठे ते वाचा
sakal_logo
By
संपत गायकवाड


बाऱ्हाळी, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः परदेशात जाऊन माणूस पैशाने कितीही मोठा झाला तरी त्याचा शेवट हा आपल्या मातृभूमीतच असतो. त्यामुळे या मातृभूमीत जन्माला येणारा हा प्रत्येकजण मातृभूमीच्या कायम ऋणात असतो. ज्या-ज्या वेळी माझ्या मातृभूमीवर संकट येईल त्या त्या वेळी काही अंशी मातृभूमीची मदत करून मी मातृभूमीच्या कायम ऋणात राहणार असल्याची निखळ भावना ठेवून सदैव मदतीचे हात पुढे करणारा मूळ सोलापूर येथील रहिवासी असलेले व अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर कार्यरत असलेले मंदार जोशी यांनी मुखेड तालुक्यात या कोरोनामुळे अडकलेल्या चाळीस कलावंतांना लॉकडाउन उठेपर्यत त्यांना पुरेल एवढे अन्नधान्य उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासत इतरांसाठी आदर्श घालून दिला आहे.


लॉकडाउन कधी उघडणार हे सांगताही येत नाही
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता देश सुरक्षेच्या कारणावरून केंद व राज्य सरकारने देशात लॉकडाउन केला असताना मात्र, आपल्या टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी व कुटुंबाचा उदर्निवाह चालविण्यासाठी झारखंड, कर्नाटक, छत्तीसगड येथील ४० कलावंत मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे एक महिन्यापूर्वी सर्कस चालविण्यासाठी आले होते. पण अचानक झालेल्या या लॉकडाउनमुळे परराज्यातील हे चाळीस कलावंत अडकून पडले. या लॉकडाउनच्या काळात सर्कसचा खेळही होत नाही आणि लॉकडाउन कधी उघडणार हे सांगताही येत नाही. 

हेही वाचा -  कोरोनाशी फ्रन्टलाईनवर लढणारा पोलिस असुरक्षीत- कुटुंबीय भयभीत


चेहऱ्यावर मात्र स्मितहास्य 
सर्कसचा खेळ केल्याशिवाय पोटाला काहीच मिळणार नसल्यामुळे या चाळीस कलावंतांसह त्यांच्या मुलाबाळांवर उपासमारीची दुर्देवी वेळ आली असल्याची माहिती देगलूर येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी त्यांचे अमेरीकेतील मित्र मंदार जोशी यांच्याशी फोनवर सांगितली. मंदार जोशी यांनी लगेचच या कलावंतांच्या कुटुंबाला लॉकडाउन उठेपर्यंत पुरेल एवढे अन्नधान्यासह उपजिविकेसाठी लागणारे साहित्याचे वाटप उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते लगेच वाटप करायला लावले. भारतीय नागरिक कितीही दूर गेला असला तरी त्याचे मातृभूमीशी असलेले ऋणांनुबंध हे कधीही विसरू शकणार नाही, हेच यावरून दिसून येते. कलावंतांना मदत मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मितहास्य आले.

मी माझी मातृभूमी सोडून परदेशात राहात असलो तरी मी एक भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. ज्या-ज्या वेळी माझ्या मातृभूमीवर संकट येईल मी त्या वेळी माझ्या मायभूमीतील नागरिकांची मदत करण्यासाठी सदैव तत्पर असेन. नागरिकांनी धीर न सोडता प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- मंदार जोशी, इंजिनिअर, अमेरिका.


कोरोनासारख्या गंभीर आजाराने सर्वत्र थैमान घातले असल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे हाल होत आहेत. अशा गरजू लोकांपर्यत शासन पोचत आहे. पण अशा गरिबांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आता पुढे येण्याची खरी गरज आहे. तर ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमात दानशूर व्यक्तीने मदत करून राष्ट्रीय कार्यात योगदान दिले पाहिजे.
- शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी, देगलूर.