‘खाकी’ची सहायता

एकनाथ तिडके
शुक्रवार, 27 मार्च 2020


माळाकोळी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी सोशल माध्यमातुन आवाहन करुन कळवले आहे की, माळाकोळी परिसरातील जे कष्टकरी, मजुरदार व गरीब कुटुंब असतील जे संचारबंदीमुळे कामावर जाऊ शकत नाहीत उपासमार होत आहे, अशा कुटुंबाला ईतर शासकीय मदत मिळेपर्यंत आपण गहू, तांदुळ व ईतर जीवनावश्यक वस्तु देणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. 

माळाकोळी, (ता.लोहा, जि.नांदेड) ः सध्या ‘कोरोना’ विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण देशात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या मुळे सर्व प्रतिष्ठाने, व्यापार, उद्योग, व्यवसाय सध्या बंद आहेत. ज्यामुळे अनेक गरीब व मजुरी करुन जगणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या मुळे अशा गरजु कुटुंबाला मदत करण्यासाठी माळाकोळी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड सरसावले आहेत. अशा कुटुंबाला ईतर शासकीय मदत मिळेपर्यंत ते धान्य देणार आहेत.

 

‘खाकी’वर्दीची माणुसकी
माळाकोळी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी सोशल माध्यमातुन आवाहन करुन कळवले आहे की, माळाकोळी परिसरातील जे कष्टकरी, मजुरदार व गरीब कुटुंब असतील जे संचारबंदीमुळे कामावर जाऊ शकत नाहीत उपासमार होत आहे, अशा कुटुंबाला ईतर शासकीय मदत मिळेपर्यंत आपण गहू, तांदुळ व ईतर जीवनावश्यक वस्तु देणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. कोरोना विषाणुमुळे सध्या आणीबाणीसदृश्य कठीण परस्थीती निर्माण झाली असताना ‘खाकी’वर्दीची माणुसकी माळाकोळी येथे अनुभवायला मिळत आहे.

हेही वाचा -  नांदेडला किराणा घरपोच मिळणार, काळजी करु नका...

आवाहनाला प्रतिसाद 

सर्वत्र कायम पोलिस हे उपेक्षेचे धनी असतात त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे क्वचीतच कौतुक होते, राज्यात पोलिसांनी रिकामटेकड्या बाहेर फिरणाऱ्यांवर उगारलेला ‘दंडुक्या’मुळे पोलिस चर्चेत असतानाच माळाकोळीत पोलिसांची साहायता पाहायला मिळाली आहे. त्यांच्या आवाहनानंतर ईतरही काही नागरीकांनीही प्रतिसाद देत आपणही मदत करु असे कळवले आहे. प्रा. माधव कागणे यांनीही पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपणही मदत करणार असल्याचे सांगीतले आहे.

 

८४२१५४४५४८ यावर संपर्क करावा
माळाकोळी व परिसरातील गरीब कुटुंब जी या संचारबंदीमुळे उपासमारीचा सामना करत असतील, अशा कुटुंबांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आपण त्यांना गहू, तांदुळ, डाळ या धान्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी गरजु कुटुंब असतील तर ८४२१५४४५४८ यावर संपर्क करावा असे पोलिस उपनिरीक्षक संदिप कराड यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help by the police