esakal | 'वंचितांना वेळीच मदत करण्यात माणूसपण'
sakal

बोलून बातमी शोधा

कळंब ः शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. आ. ह. साळुंखे. या वेळी डॉ. अशोक मोहेकर आदी.

वंचित, गरजवंतांना वेळीच मदत करण्यात माणूसपण आहे. ग्रामीण जीवनमान समृद्ध करण्यासाठी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी शैक्षणिक चळवळीद्वारे संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे मत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्‍त केले.

'वंचितांना वेळीच मदत करण्यात माणूसपण'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळंब (जि.उस्मानाबाद) : वंचित, गरजवंतांना वेळीच मदत करण्यात माणूसपण आहे. ग्रामीण जीवनमान समृद्ध करण्यासाठी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी शैक्षणिक चळवळीद्वारे संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे मत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्‍त केले.


येथील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय व शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवारी (ता.25) डॉ. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी गौरव सोहळा व ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. साळुंखे बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब बारकूल, सचिव डॉ. अशोक मोहेकर, प्रा. अर्जुन जाधव यांच्यासह संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.


डॉ. साळुंके म्हणाले, की उच्चशिक्षित पात्रता धारण केल्यानंतर स्वतःचे वैयक्तिक जीवन सुखात न घालता या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, बहुजनांच्या विकासाचा "ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा' या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मोहेकर गुरुजींनी निर्धार केला. ग्रामीण जीवनमान समृद्ध करण्यासाठी त्यांनी शैक्षणिक चळवळीद्वारे संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे ते म्हणाले. 
प्रा. जाधव यांनी मोहेकर गुरुजींनी केलेल्या त्यागामुळेच या भागाचे चित्र सकारात्मक बदललेले असल्याचे सांगितले. याशिवाय डॉ. साळुंखे ही व्यक्ती नसून, एक विचार आहे, असे मत व्यक्‍त केले.


या समारंभात गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ज्ञानरत्न, ज्ञानदीप, ज्ञानगौरव, सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, पूरग्रस्तांसाठी 75 हजारांचा मदत निधी सुपूर्द करण्यात आला. महाविद्यालयीन माजी विद्यार्थी समाज सेवा मंडळ व रोटरी क्‍लबच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 
प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. मोहेकर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाला संस्थेतील कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. डी. एस. जाधव, प्रा. संजय मिटकरी, डॉ. केदार काळवणे, प्रा. गोरमाळी, अरविंद शिंदे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. दादाराव गुंडरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कमलाकर जाधव यांनी आभार मानले. 

loading image
go to top