esakal | नुकसानीच्या पंचनाम्यानंतरच शेतकऱ्यांना मदत : पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada

नुकसानीच्या पंचनाम्यानंतरच शेतकऱ्यांना मदत : पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येवला : राज्यात पावसाने (Rain) शेतीचे नुकसान केले. या नुकसानीला सरसकट मदत देण्यात तांत्रिक अडचणी आहेत. कोणत्या शेतकऱ्याने (Farmer) कोणते पीक, किती क्षेत्रात घेतले, त्याचे नुकसान कसे झाले याचा तपशील मिळवूनच मदत देता येणार आहे.

ही सरसकट नव्हे, तर व्यक्तिगत स्वरूपाची मदत असल्याने नुकसानीची सविस्तर माहिती पंचनामे करून जमा केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे सांगितले. राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रे' निमित्त येवला येथे आले असताना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील भूमिकेविषयी विचारले असता, महाविकास आघाडीतील घटकांसोबत एकत्र लढण्याला आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: IND vs ENG: "त्यांना नावं ठेवण्याआधी तुम्ही काय केलंत ते आठवा"

जे बरोबर येतील त्यांना सोबत घेतले जाईल, स्थानिक पातळीवरचे राजकारण पाहून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे प्रश्न, संघटनेचे काम पाहण्यासाठीच मी हा दौरा सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top