‘हे’ आजोबा ऐंशिव्या वर्षातही ‘फिट’

Nanded News
Nanded News

नांदेड :  मनासोबतच शरीरही तंदुरुस्त असेल तर तणावरहित जिवन जगता येणे शक्य आहे. याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे ८० वर्षांचे अनंतराव करंजगीकर. याही वयात हे आजोबा दररोज सकाळी सहा वाजेपासून मॉर्निंग वॉक करणाऱ्या तसेच मैदानावर एकत्रित जमलेल्यांना निरोगी राहण्यासोबतच स्वच्छतेचाही संदेश देतात. एवढेच नाहीतर विद्यार्थ्यांनी निरोगी जीवन जगावे यासाठी शाळा, महाविद्यालयांत जावून ‘फिट’ राहण्यासाठी वर्गही ते नियमित घेत आहेत.  


अनंतराव करजगीकर यांनी आयुष्यातील ५० वर्षे समाजसेवाला वाहिलेली आहे. त्यांची भटकंती नांदेडकरांसाठी नवीन नाही. सत्यगणपती, हनुमान मंदिर, गजानन महाराज मंदिर आदी ठिकाणी मिळेल त्यावरच ते उदरनिर्वाह करतात. अलिकडे मुलांमध्ये ताणतणाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे श्री. करजगीकर हे शाळा, महाविद्यालयांत जावून विद्यार्थ्यांना आयुष्यात ‘फिट’ राहण्यासाठीचा मंत्र अखंडित देत आहेत. 


श्री. करजगीकर सांगतात, की देशातील प्रत्येक नागिरक जेव्हा निरोगी असेल, तेव्हाच देश हा प्रगतीच्या शेवटच्या बिंदूवर जावून पोहचू शकेल. त्यासाठी आरोग्य महत्त्वाचे असते. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याला विशेष महत्त्व असून, त्याची काळजी लहानांसह मोठ्यांनीही घेतली पाहिजे. आरोग्य बिघडल्यावर सुधारत बसण्यापेक्षा, आरोग्य बिघडू नये म्हणून काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे . म्हणतात ना ‘आपले आरोग्य आपल्या हाती’. त्यामुळे शालेय, महाविद्यालयीन जीवनापासूनच आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असा संदेश श्री. करजगीकर प्रत्येक लहान मुलांसह, युवक व पुरुष-महिलांना देत दिवसभर भटकंती करत आहेत.    

शरीर म्हणजे यंत्र नव्हे
आपण यांत्रिक युगात वावरत असलो तरी, आपले शरीर यंत्र नाही. त्यामुळे त्याच्याप्रमाणे धावण्याचा प्रयत्न कुणीच करायला नाही पाहिजे.  व्यायामामुळे व्यक्तीला आपला आरोग्यविषयक दर्जा उंचावता येतो. नियमित व सुयोग्य व्यायाम असल्यास निरोगी, दीर्घकालीन, सुदृढ आरोग्य लाभते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परंतु, व्यायामाबारोबच विश्रांतीही तेवढीच महत्त्वाची आहे.  आरोग्य आणि विश्रांती या दोन्ही प्रक्रिया अंतरिक सहसंबंध आहे. व्यक्तीचे शरीर म्हणजे यंत्र नव्हे. विशिष्ट काळापर्यंत व्यक्ती एखादेच काम करू शकते. पुन्हा तिला थकवा येतो. तेव्हा विश्रांती गरजेची असते. योग्य प्रसंगी चांगल्या प्रकारची विश्रांती घेतल्यास विश्रांती नंतर व्यक्तीचे शरीर उत्साही बनते व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.


महिलांमध्ये आवळा रेसिपीचीही जागृती
आवळा रेसिपी डीटीपी करून त्याची प्रत भेटेल त्या महिलांना देवून जीवनात फीट कसे राहायचे याचा मंत्र करजगीकर देतात. आयुर्वेदामध्ये आवळ्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. रसपूर्ण आवळा शक्तीवर्धक रसायनाने समाविष्ठ असतो. आपल्याला वर्षभर हे फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापर करू शकतो. आवळ्यामध्ये जितके 'सी' व्हिटॅमिन आढळते तितके कुठल्याच फळामध्ये नाही. याची संपूर्ण रेसिपीच त्यांनी स्वतः तयार केलेली असून, ती महिलांना मोफत देतात.

ज्येष्ठांसाठी आवळा उत्तम औषध
आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, शक्तिवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.
-- अनंतराव करजगीकर, नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com