
छत्रपती संभाजीनगर : आष्टी (जि. बीड) शहरातील नगरपंचायत निवडणुकीतील ५५० बोगस मतदार असल्याच्या अहवालावर कारवाई झाली नाही. त्यामुळे सदर कारवाईबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी १४ ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करावे, अन्यथा शासनाचे काहीही म्हणणे नाही, असे समजून पुढील कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले.