Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

​५३ तोळे सोने अन् पावणेदोन किलो चांदीच्या जबरी चोरीप्रकरणी तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या; आतापर्यंत ४५ तोळे सोने हस्तगत.
High Profile Burglary in Ambajogai Solved by LCB Absconding Kingpin Arrested Valuables Worth Crores Seized

High Profile Burglary in Ambajogai Solved by LCB Absconding Kingpin Arrested Valuables Worth Crores Seized

sakal

Updated on: 

बीड - अंबाजोगाई शहरातील बंद घर गाठून तब्बल ५३ तोळे सोने आणि पावणेदोन किलो चांदीवर डल्ला मारणाऱ्या हायप्रोफाईल घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा लावला आहे. या गुन्ह्यात पसार असलेल्या तिसऱ्या मुख्य आरोपीला एलसीबीच्या पथकाने परळी येथून शिताफीने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून १८ तोळे सोने आणि ७४३ ग्रॅम चांदी जप्त केली आहे. या धडक कारवाईमुळे आतापर्यंत चोरी गेलेला कोट्यवधींचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com