Georai Accident : भरधाव वेगातील कारची दुचाकीला धडक; दुचाकीवरील ऊस तोड मजुर जागीच ठार

समोरून येत असलेल्या भरधाव कारने दुचाकीला दिली धडक
accident
accidentsakal
Updated on

गेवराई,ता - समोरून येत असलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील ऊस तोड मजुर जागीच ठार झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळची पाच वाजेच्या सुमारास गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावरील सेलू फाटा नजीक घडली.

अर्जुन भाऊसाहेब कोरे (वय-२८) (रा. काठोडा, ता. गेवराई जि. बीड) असे या अपघातात मृत झालेल्या उसतोड मजुराचे नाव आहे. कवडगाव (ता. माजलगाव) येथे तो ऊस तोडीचे काम करत होता. सोमवारी आज त्यास कोर्टात नोटरीचे काम करण्यासाठी काल रविवारी अर्जुन कोरे हा दुचाकीवरुन गाव काठोडा कडे गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावरून जात होता.

सेलू फाटा जवळपास त्याच्या दुचाकीला समोरील भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने अर्जुन याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहीती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.

घटनेची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृत अर्जुन कोरे याच्या पाश्चात्य आई-वडिल, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार असून, झालेल्या दुर्घटनेबाबत काठोडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com