

भरधाव कारने ट्रॅक्टरला मागील बाजूने धडक दिली, ज्यामुळे कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला.
Sakal
फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव मार्गावरील पाथ्री येथील बस स्थानक परिसरात शनिवारी (दि.११) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव स्विफ्ट कार आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एका महिलेचा हात फ्रॅक्चर झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.