Mahavitaran News : महावितरणला बसणार आणखी एक ‘हायव्होल्टेज’ शॉक; १३.७० कोटींच्या गैरव्यवहारात पुरवणी अहवाल सादर, अनेक अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार! ​सहा जणांचे निलंबन

महावितरणच्या बीड विभागीय कार्यालयातील देखभाल व दुरुस्ती कामाच्या निधी वाटपातील १३ कोटी ७० लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. पण....
MSEDCL Senior Officers Suspended

MSEDCL Senior Officers Suspended

sakal

Updated on: 

- नितीन चव्हाण

बीड - महावितरणच्या बीड विभागीय कार्यालयातील देखभाल व दुरुस्ती कामाच्या निधी वाटपातील १३ कोटी ७० लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी या विभागात आणखी एक मोठा शॉक बसण्याची चिन्हे आहेत.

पहिल्या टप्प्यात केवळ एकाच विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असली, तरी चौकशी समितीने कोणालाही सुगावा लागू न देता तब्बल तीन वेळा अत्यंत गोपनीय पद्धतीने स्थळ पाहणी व तपासणी करून वरिष्ठ कार्यालयाकडे पुरवणी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर उपविभागांतील अनेक वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार लटकली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...