

Dr. Chandrasen Kothawale Receives Prestigious Bharat Bhushan National Award
esakal
-हबीबखान पठाण
पाचोड: येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना उच्च शिक्षण, विद्यार्थी विकास आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गुरुवारी (ता. २५) नवी दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते 'भारत भूषण राष्ट्रीय अवार्ड–2026' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.