मराठवाड्यात महसुलात प्राप्तिकरची आघाडी 

प्रकाश बनकर
बुधवार, 12 जून 2019

  • दोन हजार 126 कोटींचा महसूल जमा 
  • एक लाख 27 हजार 611 नवे करदाते 

औरंगाबाद : कर चुकविणाऱ्यांविरोधात प्राप्तिकर विभागातर्फे मराठवाड्यात जोरदार कारवाई सुरू आहे. यामुळे करदात्यांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक लाख आणि यंदाही तितकेच करदाते वाढल्यामुळे महसुलात मोठी वाढ झाली आहे. चालू वर्षांत विशेष मोहीम व जनजागृतीमुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत दोन हजार 126 कोटींचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती प्रधान आयुक्‍त दोनचे के. पी. सी. राव यांनी सोमवारी (ता. 10) दिली. 

देशात नोटाबंदीपासून करचोरी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर कर देशासाठी किती उपयुक्‍त आहे, याची माहिती व जनजागृती कार्यक्रम प्राप्तिकर कार्यालयातर्फे सातत्याने घेण्यात आले. करचुकवेगिरी करणारांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आल्याने करदात्यांच्या संख्येबरोबर महसुलातही वाढ झाली. मराठवाड्यात एप्रिल 2018 ते मार्च 2019 यादरम्यान एक लाख 27 हजार 611 नवे करदाते जोडले गेले. त्यांच्याकडून 2 हजार 126 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 501 कोटी रुपयांची महसुलात वाढ झाली आहे, असे श्री. राव यांनी सांगितले. 

जून 2016 मध्ये 100 कोटी रुपये अग्रिम कर (ऍडव्हान्स) जमा झाला होता. तो एप्रिल ते जून 2017 मध्ये 120 कोटी रुपयांवर गेला. या करासह यंदा विभागातील प्रत्येक जिल्हा कार्यालयाने त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. नोटाबंदीनंतर 500 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर झाली होती. 

प्राप्तिकर कार्यालय - (एप्रिल 2017 ते मार्च 2018) 
 

नवे करदाते  जमा महसूल
सीआयटी - 1 32 कोटी 
सीआयटी - 2 739 कोटी 
एकूण  1 हजार 625 कोटी रुपये 

प्राप्तिकर कार्यालय - (एप्रिल 2018 ते मार्च 2019) 
 

सीआयटी - 1 1009.52 कोटी रुपये 
सीआयटी - 2 1116.55 कोटी रुपये
एकूण 2 हजार 126 कोटी रुपये
नवे करदाते 1 लाख 27 हजार 611 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highest amount of incometax have been collected at Marathwada