ज्वारीला मिळतोय विक्रमी दर   

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

औरंगाबाद : बाजारात दाखल झालेल्या नव्या ज्वारी आणि गव्हाला मोठी मागणी दिसून येत आहे. यंदा गव्हाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे. जुन्या मोंढा, बाजार समितीत नव्या गव्हाला दोन हजार 300 ते चार हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे; तर फिल्टर केलेल्या ज्वारीला दोन हजार 300 ते तीन हजार 200 रुपयांचा दर मिळत आहे. दर चांगला असला तरी आवक मात्र आठवड्याभरापासून घटली असल्याचे अडत व्यापारी दिलीप गांधी यांनी सांगितले. 

अत्यल्प झालेल्या पावसामुळे खरीप आणि रब्बीवर थेट परिणाम दिसून आला. यामुळे ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे. त्यांनी गहू, ज्वारी आणि बाजारी ही पिके घेतली. त्यांना चांगला फायदा झाला आहे. बाजारात विक्रीला आलेल्या स्थानिक ज्वारीला 2,300 ते 2,800 रुपयांचा दर तर स्थानिकमधील चांगल्या ज्वारीला तीन हजार 200 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बार्शीच्या मोठा फिल्टर केलेल्या ज्वारीला चार हजार 800 चा विक्रमी दर मिळत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर गव्हाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे स्थानिक गव्हाला 1,900 ते 2,300 रुपये दर मिळत आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या (1544) या गव्हाला 2,300 ते 3,200 रुपये तर नर्मदा गव्हास 2,250 ते 3,400 रुपये तर अस्सल शरबती गव्हास 3,600 ते 4,500 रुपयांचा दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

गेल्या आठवड्याभरापासून गव्हाची आवक कमी झाली आहे. पूर्वी मध्यप्रदेशातून रोज दहा ट्रक गहू यायचा. आता फक्‍त तीन ट्रक येत आहे. गव्हाच्या दरात शंभर रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीला पाच हजार रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळत आहे. 
- दिलीप गांधी, अडत व्यापारी, जाधववाडी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highest price to jowar