Beed News: लढाईचा हिंदवी साम्राज्य विजय दिन राक्षसभुवनात साजरा,पानिपत लढाईनंतर माधवराव पेशव्यांनी मिळविला होता पहिला विजय
Madhavrao Peshwa: गेवराईच्या राक्षसभुवन येथे पानिपतच्या लढाईनंतर माधवराव पेशव्यांनी मिळविलेल्या पहिल्या विजयाच्या २६२ व्या वर्धापन दिनानिमित्त हिंदवी साम्राज्य विजय दिन साजरा करण्यात आला. भव्य कार्यक्रमात इतिहासप्रेमी आणि गोरक्षक सहभागी झाले.
गेवराई : बीडमधील गेवराईतील राक्षसभुवन येथील शनी देवस्थान परिसरात काल रविवारी लढाईचा हिंदवी स्वराज्य दिन साजरा करण्यात आला.पानिपतच्या लढाई नंतर माधवराव पेशव्यांनी पहिला विजय साकार केला होता.या लढाईला काल २६२ वर्ष पुर्ण झाली आहेत.