हिंगोलीत शुक्रवारी नव्याने २७ रुग्ण पॉझिटिव्ह तर २० रुग्णांना सुट्टी

राजेश दारव्हेकर
Saturday, 5 September 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शुक्रवारी  प्राप्त झालेल्या  अहवालानुसार  आरटीपीसीआर तपासणी  २३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर १८ , कळमनुरी परिसर  दोन, 

हिंगोली : जिल्ह्यात शुक्रवारी ता. ४ नव्याने २७ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून, यातील २३ रुग्ण हे आरटीपीसीआरटी तपासणीत आढळून आले आहेत .तर चार रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. वीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शुक्रवारी  प्राप्त झालेल्या  अहवालानुसार  आरटीपीसीआर तपासणी  २३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर १८ , कळमनुरी परिसर  दोन, 

वसमत परिसर तीन, असे एकूण २३ रुग्ण  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण चार रुग्ण सापडले असून, यात कळमनुरी परिसरातील रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा आमदार मुटकुळे यांच्या पाठीशी शिक्षकांची प्रेरणा, कशी ते वाचा..

वीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी

तर आज वीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील तीन ,कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील दहा,वसमत कोरोना सेंटर येथील तीन ,कळमनुरी केअर सेंटर येथील चार असे एकूण  वीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

१४ रुग्णांची  प्रकृती चिंताजनक

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी दहा रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या चार  रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण १४ रुग्णांची  प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

येथे क्लिक करा - पुस्तकांचा खजिना अन् शिक्षकांच्या प्रेरणेने घडलो - आयुक्त डॉ. सुनील लहाने

आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १६१५ रुग्ण झाले असून, त्यापैकी १३६० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण २३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Hingoli, 27 new patients are positive and 20 patients are discharged hingoli news