
वडील विठ्ठलराव व काका बालाजी राऊत यांनी पर्यावरण पूरक विवाह सोहळा पार पाडत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. लग्नात लाखो रूपयाची उधळन. लाखो रुपयाच्या वस्तू वरील खर्च टाळून कमीतकमी खर्चात विवाह सोहळा पार पाडता येतो. याचे उदाहरणच, या कुटुंबाने समोर आणले आहे.
हिंगोली - वसमत तालुक्यातील तेलगावचे विठ्ठलराव राऊत यांची कन्या विद्याचा विवाह बुधवार ता.नऊ सकाळी घरगुती पद्धतीने खुजड्याचे त्र्यंबकराव कु-हे यांचे चिरंजीव गजानन यांच्याशी झाला. या लग्न समारंभात वधु पित्या कडून वधुस आंदण म्हणून ३१ फळझाडे भेट देण्यात आली. ज्यात नारळ सहा,चिकु सहा, चिंच सहा ,सिताफळ सहा, जांभूळ सहा आणि तुळस अशी फळझाडे दिली.
वडील विठ्ठलराव व काका बालाजी राऊत यांनी पर्यावरण पूरक विवाह सोहळा पार पाडत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. लग्नात लाखो रूपयाची उधळन. लाखो रुपयाच्या वस्तू वरील खर्च टाळून कमीतकमी खर्चात विवाह सोहळा पार पाडता येतो. याचे उदाहरणच, या कुटुंबाने समोर आणले आहे.
लग्नात लाखो रुपयाच्या वस्तू देऊन ज्या की चार पाच वर्षात निरउपयोगी होतात, खराब होतात. अश्या वस्तू टाळून पुढील पाच पिढ्यांना ज्या झाडाचा उपयोग होईल असे फळझाडे आंदण देण्यात आले. मागील दोन वर्षापासून एक मुल तीस झाडे अभियान ही संकल्पना विवाहसोहळ्यात राबवण्यासाठी प्रेरित करते. विवाह सोहळ्यात इतर खर्च वाचून पर्यावरण पूरक विवाह सोहळा संपन्न होईल. नवदांपत्याच्या पुढील पाच पिढ्यांना लग्नाची आठवण राहिल आणि फळझाडापासून उत्पन्न मिळून कुटुंब सुखी जीवन जगेल.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात मंगळवारी तीन बाधितांचा मृत्यू, ४९ अहवाल पॉझिटिव्ह -
कोरोनाच्या काळात सर्वत्र बंद असतांना शेती सुरूच होती. माणूस कोणत्याही वस्तूंच्या उपभोगाशिवाय जगू शकतो परंतू अन्नाशिवाय जगू शकत नाही. अन्न धान्य चांगले पिकण्यासाठी निसर्गाचे संतुलन राखणे गरजेचे आहे. त्याच बरोबर हमीचे उत्पादन शेतक-याला मिळणेही गरजेचे आहे. फळझाडांच्या लागवाडीमुळे हे दोन्ही उद्दिष्ट पूर्ण होतात.म्हणून निदान शेतकरी बांधवांनी तरी आपल्या कुटुंबाच्या आणि शेतीच्या उपयोगी स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे.
लग्न सोहळ्यात इतर वस्तू ज्या पद्धतीने भेट देतो. त्याऐवजी फक्त तीन हजार रुपयाची तीस फळझाडे दिली तर पुढील पाच पिढ्या सुखी होतील. कुटुंबातील व्यक्तीला फळे खायला तर मिळतील बरोबरच या झाडापासून उत्पन्नही मिळेल. हाच उद्देश डोळ्या समोर ठेवून वधुचे काका बालाजी राऊत, सखाराम चापके, आजोबा रामकिशन राऊत यांनी हे पाऊल उचलले आहे व शेतकरी बांधवांनीही पुढील संकटाचा सामना करण्या साठी हे पर्यावरण पूरक पाऊल उचलण्याची विनंती केली आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे