हिंगोली : अंतरजिल्हा बदल्यात ५४ गुरुजी हिंगोलीत हजर

राजेश दारव्हेकर
Friday, 28 August 2020

राज्य शासनाने चौथ्या टप्यात ९७ शिक्षकांच्या याद्या जिल्हा परिषदेकडे पाठविल्या आहेत.त्यापैकी केवळ ५४ गुरुजी हजर

हिंगोली ; शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदल्या व्हाव्यात यासाठी प्राथमिक शिक्षक संघाने प्रयत्न सुरु केले होते, त्यानुसार राज्य शासनाने चौथ्या टप्यात ९७ शिक्षकांच्या याद्या जिल्हा परिषदेकडे पाठविल्या आहेत.त्यापैकी केवळ ५४ गुरुजी हजर झाल्याने त्यांना गाव व शाळा देण्याचे काम विषय शिक्षकानुसार देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने राज्यातील शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचां चौथा टप्पा  दहा आॅगष्ट रोजी पुर्ण केला असुन, तसे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या लाॅगिनला निर्गमित केले आहे. आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात ९७ शिक्षक येत आहेत तर ३६ शिक्षक हिंगोली जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाणार आहेत. या शिक्षकांच्या बदल्या अनेक दिवसांपासून रखडल्या होत्या त्यामध्येच कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव वाढल्यामुळे हया बदल्या होणार किंवा नाही असा संभ्रम शिक्षकांमध्ये निर्माण झाला होता वेळोवेळी शिक्षक संघटनेला पडला होता.

आत्तापर्यंत ५४ शिक्षक उपस्थित

त्यानुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी  यांनी बदल्या करण्यात याव्यात म्हणून सारखा तगादा लावला होता.त्यानुसार अंतर जिल्हा बदलीच्या ९७ शिक्षकांच्या याद्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या असून त्यापैकी आत्तापर्यंत ५४ शिक्षक उपस्थित झाल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातून ३६ शिक्षक बाहेर जिल्ह्यात जाणार असून ९७ शिक्षक येणार

राज्यातील आंतरजिल्हा पात्र शिक्षकांचे बदल्याचे आदेश १० आॅगष्ट रोजी काढले असून आॅनलाईन आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने आपल्या जिल्ह्यात जाणा-या शिक्षकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून पती-पत्नी दुरवर असल्याने आता एकाच जिल्ह्यात नौकरी करणार असल्याने आनंदीत झाले आहेत.हिंगोली जिल्ह्यातून ३६ शिक्षक बाहेर जिल्ह्यात जाणार असून ९७ शिक्षक येणार असल्याने पती पत्नी एकत्रीकरणास शासनाने सहमती दर्शवली आहे. बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न रेंगाळत पडला होता. आता अंतर जिल्हा शिक्षक बदलीचा मार्ग मोकळा झाला असून ९७ शिक्षका पैकी बाहेर जिल्ह्यातून ५४ शिक्षक रुजू होण्यासाठी हजर झाले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: 54 inter-district transfers present in Hingoli