
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, तसेच भिकाजी किर्तनकार, सुभाष हुले, भारत महाराज, रामराव सोळंके, अँड के.के. शिंदे, डॉ. रमेश शिंदे, संतोष टेकाळे, नारायण खेडेकर, काशीराम बुवा, दाजीबा पाटील, विलास कासार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
हिंगोली : तालुक्यातील श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथे श्री संत नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंती महोत्सवाला शुक्रवारपासून (ता. २०) सुरुवात झाली असून सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, तसेच भिकाजी किर्तनकार, सुभाष हुले, भारत महाराज, रामराव सोळंके, अँड के. के. शिंदे, डॉ. रमेश शिंदे, संतोष टेकाळे, नारायण खेडेकर, काशीराम बुवा, दाजीबा पाटील, विलास कासार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
हेही वाचा - हिंगोली : लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई होईना
संत नामदेव महाराज जयंती महोत्सवानिमित्त संस्थान कडून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.संत नामदेव महाराज यांच्या ७५० वा जयंती महोत्सव यावर्षी संत नामदेव यांच्या जन्म ठिकाणी संत नामदेव मंदिर संस्थानच्या वतीने साजरा करण्यात येत असून शुक्रवारपासून मंदिर परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहास सुरवात झाली मंदिर परिसरात ता.२० ते २७ नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या सप्ताहामध्ये, गाथा पारायण सोहळा, हरिपाठ, प्रवचन भजन, महापूजा, आरती, व ता.२० ते २५ दरम्यान दररोज नामवंत प्रवचनकार कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच ता. २६ भागवत एकादशी रोजी शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हिंगोली वर्षा गायकवाड, सुरेशअप्पा सराफ यांच्या हस्ते श्रीच्या वस्त्र समाधीची महापूजा सकाळी सात वाजता होईल. व दुपारी २ ते ४ या वेळेत श्रीच्या पालखीची भव्य नगर प्रदक्षिणा होणार आहे.
ता. २७ रोजी भारत महाराज बेंगाळ यांचे सकाळी ९ ते ११ काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या संत नामदेव महाराज जन्मोत्सव कार्यक्रमाचा परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत नामदेव महाराज मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
|