हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ९, ९६७ अर्ज दाखल

राजेश दारव्हेकर
Thursday, 31 December 2020

अर्ज दाखल करण्यासाठी ५.३० ची वेळ दिली होती . वेळेत शेकडो उमेदवार उमेदवारी दाखल करण्याच्या ठिकाणी दाखल झाले होते . त्यामुळे अशांचे अर्ज स्वीकारण्यासाठी साडेसहा ते सातपर्यंत वेळ लागला.

हिंगोली : जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतीच्या १, ५४८ प्रभागातील ४, ०३५ जागांसाठी बुधवार (ता. ३०)  शेवटच्या दिवशीयर्यंत ९, ९६७ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. 

अर्ज दाखल करण्यासाठी ५.३० ची वेळ दिली होती . वेळेत शेकडो उमेदवार उमेदवारी दाखल करण्याच्या ठिकाणी दाखल झाले होते . त्यामुळे अशांचे अर्ज स्वीकारण्यासाठी साडेसहा ते सातपर्यंत वेळ लागला . त्यामुळे एकुण आकडेवारी प्रसिद्ध करण्यासाठी विलंब लागला.  दरम्यान हिंगोलीत ९५ ग्रा.पं.च्या २९८ प्रभागांसाठी १, ८९३ अर्ज आले आहेत तर शेवटच्या दिवशी ५९ अर्ज दाखल झाले आहेत, कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींसाठी २, ०८९ अर्ज दाखल झाले आहेत. सेनगाव तालुक्यातील ९७  ग्रामपंचायतींच्या ७९९ जागांसाठी २, ०४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अखेरच्या दिवशी १, ३०९ अर्ज आले आहेत. तर सहा ग्रा.पं. बिनविरोध झाल्या आहेत . औंढा नागनाथ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या ७०४ जागा १, ७३९ अर्ज दाखल झाले आहेत. २४७ प्रभागात हे अर्ज आले. वसमत तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या ८८८ जागांसाठी  २, ३९१अर्ज आले आहेत. शेवटच्या दिवशी १, ३४० अर्ज आले आहेत.

हेही वाचा -  कोरोना संसर्गामुळे होणार सव्वाशे वर्षाची परंपरा खंडीत, तामसा येथील ‘भाजी-भाकर’ पंगत रद्द -

सेनगाव तालुक्यातील ९७ पैकी सहा ग्रा.प. ची निवडणूक बिनविरोध झाली. यात सालेगाव , बोरखडी जी, हनकदरी शेगाव खोडके. वरखेडा, सापडगावचा समावेश आहे. 

बुधवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप आले होते. चार जानेवारील माधार घेण्याचा शेवटचा दिवस असुन त्याच दिवशी चिन्हवाटप होणार आहे यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. १५ रोजी मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: 9,967 applications filed in Gram Panchayat elections in the district hingoli news