
ग्रामीण भागातील भाजी व भाकरी या खाद्याचे महत्व अधोरेखित करणाऱ्या पंगतीमध्ये प्रसाद घेण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा या भागातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शन व प्रसादासाठी येत असतात. पण यावर्षी कोरोना संकटाच्या सावटाखाली भाजी- भाकरी पंगत आली असून सार्वजनिक ठिकाणी पंगतीच्या निमित्ताने होणारी हजारोंची गर्दी लक्षात घेऊन खबरदारी व काळजी म्हणून बारालिंग देवस्थान समितीने यावर्षी पंगत रद्द करण्याचा निर्णय केला आहे.
तामसा - नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या तामसा येथील बारालिंग मंदिराची आगळीवेगळी भाजी-भाकरीची पंगत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्त समितीकडून घेण्यात आला आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी (करीदिनी) राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक समतेचा संदेश देत ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणाऱ्या या भाजी-भाकरी पंगतीला सव्वाशे वर्षाची परंपरा आहे.
ग्रामीण भागातील भाजी व भाकरी या खाद्याचे महत्व अधोरेखित करणाऱ्या पंगतीमध्ये प्रसाद घेण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा या भागातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शन व प्रसादासाठी येत असतात. पंगतीची तयारी पंधरवड्यापासून चालू असते. पण यावर्षी कोरोना संकटाच्या सावटाखाली भाजी- भाकरी पंगत आली असून सार्वजनिक ठिकाणी पंगतीच्या निमित्ताने होणारी हजारोंची गर्दी लक्षात घेऊन खबरदारी व काळजी म्हणून बारालिंग देवस्थान समितीने यावर्षी पंगत रद्द करण्याचा निर्णय केला आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी चांगली बाजमी : तुर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन- सुधीर पाटील
कोरोना संसर्गामुळे निर्णय
संस्थानचे अध्यक्ष संतोष निलावर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त समिती व पंगत व्यवस्थापन यांची बैठक झाली. यामध्ये भाविकांच्या सार्वजनिक आरोग्याची काळजी कोरोना महामारी च्या संदर्भाने करणे आवश्यक आहे. सव्वाशे वर्षाची भाजी-भाकरी पंगतीची परंपरा यावर्षी खंडित होण्याचे दुःख निश्चितच मोठे असले तरी नागरिकांच्या जीविताची काळजी करणे आवश्यक आहे. तसेच प्रशासनाच्या या संदर्भात असणाऱ्या सूचना व मार्गदर्शनाला सहकार्य करणे गरजेची आहे.
हेही वाचलेच पाहिजे - Success Story: टोकन पद्धतीने तूर लागवड; भरघोस उत्पन्नाची हमी! माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे यशस्वी प्रयोग
पाच जणांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
भाविकांनी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पंगत रद्द होण्यामुळे मंदिराकडे दर्शन किंवा प्रसादासाठी येऊ नये. देवस्थान समितीकडून सांकेतिक स्वरूपात या दिवशी पाच जणांच्या उपस्थितीमध्ये ‘श्रीं’ला अभिषेक व प्रसाद दाखविला जाणार आहे. भाजी-भाकरी पंगत रद्द होण्यामुळे मंदिर परिसरात कुठलीही यात्रा किंवा मनोरंजनाचे सार्वजनिक उपक्रम भरविण्यास बंदी राहणार आहे, याची दखल भाविक व संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या वेळी मंदिराचे पुजारी रेवणसिद्ध कंठाळे महाराज,समितीचे अध्यक्ष संतोष निलावर, पंडित पाटील, कोषाध्यक्ष अनंतराव भोपळे, श्रीपाद लाभसेटवार, प्रदीप बंडेवार, लक्ष्मण देशमुख, रविकुमार बंडेवार, विश्वंभर परभणकर आदी उपस्थित होते.
संपादन - स्वप्नील गायकवाड