esakal | हिंगोली : नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर वाहतूक शाखेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

police

हिंगोली : नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर वाहतूक शाखेची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : शहरात मागच्या दोन दिवसापासून वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची वाहतूक शाखेने धरपकड सुरू केली असुन शनिवारी ता.४ ७० पेक्षा अधिक वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे नुतन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे कर्मचारी शहरातील मुख्य रस्त्यावर व चौकचौकत तैनात करण्यात आले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनाची धरपकड सुरू केले आहे.

यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नंबर टाकने, मोबाईलवर बोलताना गाडी चालविणे, वेगाने वाहने चालविणे, कर्नकर्कश आवाज करणे आदी वाहनावर कारवाई केली आहे. तसेच मामा, दादा, यासह विविध संदेश लिहलेली वाहने अशा वाहनांची धरपकड सुरू केली आहे. शहरातील इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौकात शनिवारी सकाळी वाहनांची धरपकड सुरु केली काही वेळातच ७० पेक्षा अधिक वाहनावर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

तसेच इतरही ठिकाणी कारवाई सुरू होती. यावेळी श्री कदम यांच्या सह रावसाहेब घुमनर, किरण चव्हाण, गजानन सा़गळे आदींचा यात समावेश आहे. वाहतूक शाखेने सुरू केलेल्या या कारवाई मुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकाची पळापळ सुरू झाली होती. दरम्यान, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी सांगितले की, वाहनधारकाने सोबत कागदपत्रे ठेवावित, वाहनांची नोंदणी करावी, वाहन परवाना ठेवावा त्यामुळे कोणालाही अडचणी येणार नाहीत.

loading image
go to top