हिंगोली : निवडणूक प्रचारासाठी सोशल मिडियाचा गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकिच्या अनुषंगाने आदर्श आचार सहिंतेचा भंग होवू नये यासाठी प्रमाणन  व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

हिंगोली : निवडणूक प्रचारासाठी सोशल मिडियाचा गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी 

हिंगोली : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाकरीता निवडणूकीत भाग घेतलेल्या उमेदवार व राजकीय पक्षांच्या पेड न्युजवर चोख लक्ष ठेवून दैनंदिन प्रसिध्द  होणाऱ्या मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडिया माध्यमातील संशयित पेड न्यूज किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती प्रसिध्दी झाल्याचे निदर्शनास आल्यास कार्यवाही करुन संबंधितास नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकिच्या अनुषंगाने आदर्श आचार सहिंतेचा भंग होवू नये यासाठी प्रमाणन  व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमाचा प्रचार-प्रसिध्दी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या गैरवापरावर आणि पेड न्यूजवर ही समिती लक्ष ठेवणार आहे. याकरीता औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक कालावधीत समितीचे सदस्यांची वेळोवेळी बैठक बोलवून मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल माध्यमातील प्रसिध्द होणाऱ्या वृत्त आणि जाहिरातींबाबत वेळोवळी आढावा घेवून आचार संहितेचा भंग करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जयवंशी यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा ऑटोमोबाईलचा ‘टॉप गिअर’, सहाशे चारचाकी तर अडीच हजार दुचाकींची होणार डिलिव्हरी -

 निवडणूकीतील सर्व उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमात (सोशल मिडिया) सर्व प्रकारच्या जाहिराती प्रसिध्दी करण्यापूर्वी सदर जाहिराती माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती यांच्या मार्फत प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच प्रमाणित न करता प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीबाबत संबंधितावर कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्हातील वर्तमान पत्रामध्‍ये प्रसिध्द होणाऱ्या बातम्या, लेख तसेच समाज माध्‍यमांतील व्हॉट्स अँप ग्रुपवरील विनापरवानगी पोस्ट, मोबाईलद्वारे बल्क एस.एम.एस. अथवा प्रचार करणाऱ्या तसेच सेवा पुरवणाऱ्या संस्थावर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्‍हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top