हिंगोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज 

राजेश दारव्हेकर
Wednesday, 13 January 2021

शुक्रवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच टेबलावर मतदान यंत्रासह साहित्य जमा करायचे आहे.

हिंगोली : तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी प्रशासनाची जय्यत   तयारी सुरु आहे. गुरुवारी (ता. १४) मतदान केंद्रावर साहित्य पाठवण्यासाठी तहसीलच्या प्रांगणात मंडप उभारून गाव निहाय २५ टेबल लावण्यात आले असुन या टेबलरून अधिकाऱ्यामार्फत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदान यंत्रासह मतदानाचे साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी सांगितले.

शुक्रवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच टेबलावर मतदान यंत्रासह साहित्य जमा करायचे आहे. अशी सुव्यवस्था तहसील प्रशासनाकडून प्रथमच निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यासाठी नायब तहसीलदार श्री.कावरखे, श्रीमती वडवाळकर श्री. गोळेगावकर आदी  पुढाकार घेत आहेत.

हेही वाचागावचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या- अब्दुल सत्तार

औंढा नागनाथ येथे तयारी पुर्ण

औंढा नागनाथ: तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतच्या निवडणुकी होत आहेत  त्यासाठी प्रशासन पूर्ण तयारी करत आहे. मतदान केंद्रावर साहित्य पाठवण्यासाठी तहसीलच्या प्रांगणात मंडप उभारून गाव वाइज २३ टेबल लावण्यात आले या टेबलरून अधिकाऱ्यामार्फत यंत्रासह मतदानाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.  निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली  नायब तहसीलदार सचिन जोशी, वैजनाथ भालेराव, शैलेश वाईकर,शरद नाईकनवरे, अनिल पाथरकर, उमाकांत मुळे, हनुमंत शेळके पुढाकार घेत आहेत.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Administration ready for voting process for Gram Panchayat elections hingoli news