हिंगोली : तब्बल १४ दिवसाच्या टाळेबंदीनंतर बाजारपेठेत गर्दी वाढली

राजेश दारव्हेकर
Thursday, 20 August 2020

,जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी रुचेशजयवंशी यांनी ६ ते १९ ऑगस्ट या कालावधीत १४ दिवसाचा कडकलॉकडाऊन करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या.

हिंगोली : १४ दिवसाच्या टाळेबंदीची शिथिलता गुरुवारी (ता. २० ) उठल्यानंतर बाजारपेठेसह शहरातील विविध बँकेत पीक कर्जाचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

दरम्यान,जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी रुचेशजयवंशी यांनी ६ ते १९ ऑगस्ट या कालावधीत १४ दिवसाचा कडकलॉकडाऊन करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या.त्यामुळे या काळात शहरातील विविध भागांतील व्यापारी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, मेडिकल व्यापारी आदींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली.विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या व पालिकेच्या वतीने दंड आकारण्यात आला, तर संचारबंदी काळात चोरून विक्री करणाऱ्या काही दुकानावर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.

हेही वाचा -  अमेरिकेत मृत्यू, नांदेडात हुंडाबळीचा गुन्हा, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...?

जिल्हा परिषदेतील २७५  कर्मचाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्यात आली

संचारबंदी काळात मात्र प्रशासकिय कार्यालय, बँकेतील अंतर्गत व्यवहार सुरु होते. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान ,संचारबंदी काळात ही कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून येत होती, याशिवाय जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा ,यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, प्रशांत तुपकरी यांना देखील बाधा झाल्याने जिल्हा परिषदेतील २७५  कर्मचाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्यात आली असता सर्वच कर्मचारी निगेटिव्ह निघाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला.परंतू त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याने अधिकाऱ्यात चिंता वाढली होती.

विरोध झुगारून संचारबंदीत बदल केला नाही

१४ दिवसाच्या लॉकडाऊनला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला होता, लॉकडाऊनमुळे फुटकळ व्यापारी, हातावर पोट असणाऱया कामगारांना नाहक त्रास होणार तर बड्या व्यापाऱ्यांकडून गरिबांची लूट होईल त्यामुळे संचारबंदी करू नये यासाठी नाट्यमय घडामोडी घडत होत्या, तरी देखील जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आपला निर्णय कायम ठेवत विरोध झुगारून संचारबंदीत बदल केला नाही. 

सोशल डिस्टन्सची ऐसी की तैसी करीत गर्दी

१४ दिवसाच्या संचारबंदीनंतर गुरुवारी (ता.२०) नागरिकांनी किराणा दुकान, भाजीपाला खरेदी साठी गर्दी केली होती. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मराठवाडा ग्रामीण बँक, आयडीबीआय ,बीओआय बँक, एसबीआय आदी बँकेत रोखीचे व्यवहार व पैसे भरण्यासाठी नागरिकांसह शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सची ऐसी की तैसी करीत गर्दी केल्याचे चित्र पाहवयास मिळत होते. तर अकोला बायपास भागातील 

येथे क्लिक करा -  इसापूर धरणाचा पाणीसाठा 75 टक्क्याच्या पुढे पैनगंगा नदीला पूर- सावधानतेचा ईशारा

शहरातील सर्वच रस्ते गर्दीने भरून दिसत होते.

एसबीआय बँकेत शेतकऱ्यांनी गर्दी करीत असल्याने शिवाय पाऊस पडत असल्याने जागा अपुरी पडत असल्याने बँक व्यवस्थापनाने अंतुले नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज भरून देण्यासाठी व स्वाक्षरी साठी व्यवस्था केल्याने बासंबा परिसरातील नागरिकांनी तोंडाला मास्क न बांधता गर्दी केल्याचे दिसून आले. संचारबंदी उठल्यानंतर गुरुवारी मात्र शहरातील सर्वच रस्ते गर्दीने भरून दिसत होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: After a 14-day lockout, the market was crowded hingoli news