
अर्जदार शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांनी केले कर्जासाठी आहे .
हिंगोली ; प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत घोषित केलेल्या कृषि मुलभूत सुविधा अंतर्गत वित्त पुरवठा योजनेतून दोन कोटीपर्यंत कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेसाठी कर्जाचा कालावधी सात वर्ष असून वार्षिक व्याजदरावर तीन टक्के सुट देण्यात आली आहे. अर्जदार शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी केले आहे.
या योजनेत अर्जासोबत योजनेची व्याप्ती, समाविष्ट प्रकल्पामध्ये या आणि योजनेत कापणीनंतरच्या व्यवस्थापनासाठीचे प्रकल्प पोर्टलवर समाविष्ट केलेले आहेत . जसे ई - मार्केटींग प्लॅटफॉर्म , प्रकल्पाचे गोदाम , पॅक हाऊस , मुरघास , संकलन केंद्र , वर्गवारी आणि प्रतवारी गृह , शितगृह , पुरवठा सुविधा , प्राथमिक प्रक्रिया केंद्र , रायपनिंग चेंबर त्याचप्रमाणे सामुहिक शेतीकरीता आवश्यक इतर कीफायतशीर प्रकल्प उदा . सेंद्रीय उत्पादने , जैविक निविष्ठा उत्पादन प्रकल्प आदींचा समावेश आहे.
वित्त पुरवठा प्राथमिक कृषि पतसंस्था , विपणन सहकारी संस्था , शेतकरी उत्पादक संस्था , स्वयं सहायता गट , शेतकरी , संयुक्त उत्तरदायित्व गट , बहुउद्देशीय सहकारी संस्था , कृषि उद्योजक , स्टार्टअप्स आणि केंद्र , राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प आदीचा समावेश आहे . या योजनेत सहभाग घेणेसाठी अर्जदार ऑनलाईन पध्दतीने योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करावी . त्यानंतर अर्जदारास नोंदणी झाल्याचे अधिकार पत्र मिळेल . इच्छूक अर्जदार लाभार्थी कर्जासाठी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे. अर्जासोबत सविस्तर प्रकल्प , अहवालाची मूळप्रत आणि प्रकल्प अहवालाशी संबंधित कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत . कर्ज देणारी संस्था या प्रकल्पाचे मुल्यांकन व्यवहार्यतेनुसार कर्ज मंजूर करावे किंवा प्रकल्प नाकारणे याबाबत निणय घेईल . कर्ज मंजूर झाल्यानंतर निधी लाभार्थीच्या बँक खात्यात परस्पर जमा करण्यात येईल . अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील तालुका तंत्र व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे