esakal | हिंगोली : कृषी आधुनिक बाजारपेठ प्रकल्पाच्या कामाला तत्वतः मान्यता- आमदार राजू नवघरे 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठरणार वरदान

हिंगोली : कृषी आधुनिक बाजारपेठ प्रकल्पाच्या कामाला तत्वतः मान्यता- आमदार राजू नवघरे 

sakal_logo
By
संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील कन्हेरगाव शिवारात राष्ट्रीय महामार्गालगत कृषी आधुनिक बाजारपेठ ( मॉडर्न मार्केट ) प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरेल अशी कृषी आधुनिक बाजारपेठ मॉडर्न मार्केट वसमत तालुक्यात तयार करण्याचे नियोजन तत्कालीन राज्यसहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले होते. त्यासाठी तालुक्यातील कन्हेरगाव येथील गट क्रमांक ७० मधील २६.४२ हेक्टर जमिनीचा ताबा शासनाच्या ३० मे २००९ आदेशानुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांना प्राप्त झाला होता. 

हेही वाचाजिल्हा बॅंक निवडणुक : हेलिकाॅप्टर व रोड रोलरचे भवितव्य मतपेटीत बंद; 97.98 टक्के मतदान -

या प्रकल्प उभारणीमध्ये सरकारचे अनुदान प्राप्त होणार असल्यामुळे सरकारचा सहभाग तसेच स्थानिक शेतकरी व्यापारी यांचा प्रकल्प चालविण्यासाठी सहभाग राहणार होता. सदरील आधुनिक कृषी बाजारपेठेत व्यापारी गाळे, शॉपिंग सेंटर, बियाणे, औषधी, खत दुकाने, स्वयंचलित वजन काटे, शेतीमाल उतरणे चढवणे, प्लॅटफॉर्म लिलाव, गृहे लीलाव वोटे, इलेक्ट्रॉनिक लिलाव कक्ष, शेतीमालासाठी गोडाऊन सुविधा, फळे भाजीपाला व धान्य साठी इलेक्ट्रॉनिक क्लिनिंग, ग्रेडिंग सुविधा, पॅक हाऊस सुविधा, मटेरियल वाहतूक उपकरणे, कोल्ड स्टोरेज, प्रीकचलिंग, रायपनिंग चेंबर, लॅबरेटरिज, कमोडीटी एक्सचेंज, प्लॅटफॉर्म सुविधा आणि सहायक सुविधांमध्ये प्रशासकीय बिल्डिंग, पोस्ट, बँक, कॅन्टींग, टेलिफोन, ट्रान्सपोर्ट, हॉटेल, पेट्रोल पंप, गॅरेज आधीचा सहभाग होता.

गुरुवारी ता. एक रोजी राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतलेल्या या संदर्भातील बैठकीत वसमत येथील आधुनिक कृषी बाजार मॉडर्न मार्केट प्रकल्पाच्या काम सुरु करण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली असल्याची माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली. या बैठकीला राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे यांची उपस्थिती होती सदरील आधुनिक कृषी बाजार प्रकल्प पूर्ण झाल्यास हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते मोठे वरदान ठरणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image