esakal | हिंगोली : जिल्ह्यात आतापर्यंत बँकानी शेतकऱ्यांना पन्नास टक्के कर्जाचे केले वाटप 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

खरीप व रब्बी हंगामासाठी वर्षाला लक्षांक ठरविण्यात येतो. त्यानुसार खरीप हंगामासाठी यंदा ११६८ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट होते. या हंगामात कर्जवाटप करण्यास  बँकाकडून टाळाटाळ  करण्यात येवू लागली

हिंगोली : जिल्ह्यात आतापर्यंत बँकानी शेतकऱ्यांना पन्नास टक्के कर्जाचे केले वाटप 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात सन २०२०- २१ च्या रब्बी हंगामासाठी २७४ कोटी ७८ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. यंदा कर्जवाटपात बँकांनी आघाडी घेतली असून आतापर्यंत ५० टक्केच्यावर कर्ज वाटप करण्यात आले आहे.

खरीप व रब्बी हंगामासाठी वर्षाला लक्षांक ठरविण्यात येतो. त्यानुसार खरीप हंगामासाठी यंदा ११६८ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट होते. या हंगामात कर्जवाटप करण्यास  बँकाकडून टाळाटाळ करण्यात येवू लागली. त्यातच कोरोनाचे संकट असल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाले नाही. परिणामी खरीप हंगामातील हेक्टरी ६० हजार रुपये मिळणे ऐवजी आता रब्बी हंगामात कमी रुपये मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचाअर्धापूर : दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार दोघे जखमी, महामार्ग पोलिस चौकी झाली अपघात चौकी.. -

जिल्ह्याला असलेल्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत १३७ कोटी ६० लाख ८० हजाराचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ज्याचा लाभ १८ हजार ५१२ शेतकन्यांना झाला आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला असलेल्या ३७ कोटी चार लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी २१ कोटी ६४ लाख ५७ हजाराचे कर्जवाटप करण्यात आले असून ज्याचा लाभ चार हजार ७५१ शेतकयांना झाला आहे. ज्याची टक्केवारी ५८. ४४ अशी आहे. व्यापारी बँकांना सर्वाधिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे.

त्यामध्ये या बँकांना असलेल्या १९७ कोटी ७० लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ९९ कोटी १२ लाख २२ हजाराचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ज्याचा लाभ १० हजार ९३२ शेतकन्यांना झाला आहे. या बँकांनी ५०. १४ टक्के कर्जवाटप केले आहे. तर ग्रामीण बँकेला असलेल्या ४० कोटी चार लाख उद्दिष्टापैकी १६ कोटी ८४ लाख एक हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. ज्याचा लाभ दोन हजार ८२९ आघाडी शेतकऱ्यांना झाला आहे. या बँकेची  टक्केवारी ४२. ०६ अशी आहे. एकुण २७४ कोटी ७८ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी जिल्हयात १३७ कोटी ६० लाभ लाख ८० हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकांनी ज्याचा लाभ १८ हजार ५१२ शेतकन्यांना झाला आहे. रब्बी हंगामात एक ऑक्टोंबरपासून कर्जवाटप सुरू करण्यात आले आहे. मध्यंतरी कर्जवाटपाची टक्केवारी घसरली  होती. मात्र डिसेंबर महिन्यांपासून कर्जवाटपात बँकांनी आघाडी घेतली. त्यामुळे कर्जवाटप ५० टक्केच्यावर गेल्याची माहिती सहकार विभागाकाडून देण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image