
हिंगोली : बासंबा फाटा येथे रास्ता रोको
हिंगोली : तालुक्यातील बासंबा फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर उड्डाणपूल करावा, या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी मंगळवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे हिंगोली ते वाशीम मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. रस्त्याच्या दुर्तफा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर बायपास उड्डाणपूल बासंबा फाटा येथे करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी दोन फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. परंतु, दखल घेण्यात आली नाही. या ठिकाणी उड्डाणपूल नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. परिणामी, जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागत असून, याठिकाणी रास्तारोको आंदोलन करावे, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यामध्ये बासंबा, पारडा, येळी पेडगाव, वाडी, चिंचोली, मौजा, सिरसम, खेर्डा, पातोंडा, भटसावंगी सावरगाव बंगला, दुर्गसावंगी, तिखाडी, गाडीबोरी, पळसोना, खानापूर बंगला, पिंपळदरी, सांडस, बोरजा येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे हिंगोली ते वाशीम मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनामध्ये सरपंच बाजीराव घुगे, ॲड. विजय राऊत, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल, संतोष बांगर, पंढरीनाथ ढाले, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशन घुगे, विलास वलेकर, मधुकर घुगे, पिंटू साबळे, आकाश पाईकराव, शेकुराव ढाले, मारोतराव ढाले, नामदेव नागरे, कुंडलिक नागरे, संतोष ढाले, त्र्यंबक ढाले, नारायण लांडगे, जब्बार भाई, भैय्या मस्के, दत्तराव घुगे, बाळू बनसोडे, ज्ञानू पाटणकर, सदाशिव मस्के, ज्ञानेश्वर लांडगे आदी सहभागी झाले होते.
Web Title: Hingoli Basamba Fata Road Block National Highway Bypass Demand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..