हिंगोली : शहरात आँनलाईन योग वर्गास मोठा प्रतिसाद

राजेश दारव्हेकर
Monday, 7 September 2020

संचारबंदीच्या काळात व्यायाम करण्यासाठी गेलेल्यांना दंड देखील भरावा लागला यामुळे अ व्यायाम करणाऱ्यानी घराबाहेर जाण्याचे टाळले मात्र नियमित व्यायाम करणाऱ्यानी व्यायाम बंद न करता त्याला पर्याय निवडत घरीच व्यायाम करण्यास सुरुवात केली.

हिंगोली : कोरोना संकटामुळे जीम, खेळाची मैदाने सुनीसुनी आहेत. यामुळे अनेकांनी घरीच व्यायाम करण्यास पंसती दिली आहे. यात सर्वाधिक योगासने करण्यावर भर दिला जात असुन शहरात आँनलाईन योग वर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना संकटामुळे अनेकांच्या व्यवसायात अडचणी वाढल्या तसेच नागरिकांना अनेक बंधने पाळावी लागत आहेत. तर याचा फटका नियमित मैदानावर जाऊन व्यायाम करणार्यांना देखील बसला आहे. संचारबंदीच्या काळात व्यायाम करण्यासाठी गेलेल्यांना दंड देखील भरावा लागला यामुळे अ व्यायाम करणाऱ्यानी घराबाहेर जाण्याचे टाळले मात्र नियमित व्यायाम करणाऱ्यानी व्यायाम बंद न करता त्याला पर्याय निवडत घरीच व्यायाम करण्यास सुरुवात केली. यात सरळ सोपा व शरीरातील उर्जा वाढविण्यासाठी महत्त्वाचा असलेला योगा करण्यासाठी भर दिला. 

हेही वाचावाळू माफियांचा हैदोस खपवून घेणार नाही- पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे
शहराच्या विविध भागात आँनलाईन योग वर्ग सुरु झाले

तर शहरात गलोगल्ली असलेल्या योग शिक्षकांनी यात लक्ष देत आँनलाईन योग वर्ग सुरू केले आहेत. याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सरस्वती नगर, गंगानगर, अकोला बायपास, खटकाळी बायपास, रिसाला बाजार, नेहरू नगर, हनुमान नगर, एनटीसी, मंगळवारा आदी भागात आँनलाईन योग वर्ग सुरु झाले आहेत. 

या शिबिराला देखील प्रतिसाद मिळत आहे

तर पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आँनलाईन योग प्रशिक्षण शिबीर सुरू केले आहे. या शिबिराला देखील प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरात प्राणायाम, आसन, आयुर्वेद, मुद्रा, पंचकर्म या विषयी माहिती दिली जात आहे. यासह विविध आजारावर योगाचे महत्त्व सांगितले जात असल्याचे योग शिक्षक विठ्ठल सोळंके, उमेश तोष्णीवाल, सुनील मुळे यांनी सांगितले. शहरात योग वर्गास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Big response to online yoga classes in the city hingoli news