हिंगोली : गोरेगावात बूट हाऊसला आग, अंदाजे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोरेगावात बूट हाऊसला आग

हिंगोली : गोरेगावात बूट हाऊसला आग, अंदाजे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान

हिंगोली : सेनगाव तालूक्यातील गोरेगाव येथे बाजारगल्ली भागातील महाराष्ट्र बूट हाऊसला शुक्रवारी ता. १० रात्री साडेदहा वाजता सआग लागल्याची घटना घडली. यात दुकानातले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यात १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गोरेगाव येथील बाजार गल्लीत सय्यद सलीम सय्यद जलील यांचे महाराष्ट्र बूट हाऊस नावाचे चप्पल व बूट विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सय्यद सलीम हे शुक्रवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करुन घरी गेले होते . नंतर रात्री साडेदहाच्या सुमारास दुकानातून धूर निघू लागला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी ही माहिती सय्यद सलीम यांना दिली. त्यांनी दुकानाकडे धाव घेऊन दुकानाचे शटर उघडले. शटर उघडताच दुकानातून आगीचे लोळ उठले . घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शॉर्ट सर्किटमुळे लागली आग नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी टाकण्यास सुरुवात केली . नागरिकसंजय पातळे , सयद सलीम सयद लाल , अनसर कुरैशी, आत्माराम कावरखे , संजय कावरखे, अशोक कावरखे , इस्राईल टेलर आदीनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.

दोन तासानंतर आग नियंत्रणात आली. तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. १० ते १५ लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.गोरेगांव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Hingoli Boot House Fire Goregaon Loss About

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top