esakal | विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू, जिंतूरमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Jintoor News

विहिरीतील महिलेचा म्रतदेह नागरिकांच्या मदतीने चारपाईच्या साहाय्याने पाण्याच्या बाहेर काढून शहरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू, जिंतूरमधील घटना

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जि.हिंगोली) : औंढा रस्त्यावरील महामार्ग पोलिस चौकीजवळ आव्हाड यांच्या शेतातील विहिरीत विवाहित महिला पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१३) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. पूजा आव्हाड (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेचे कारण समजले नाही. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

शहराबाहेरील औंढा महामार्गावरील आव्हाड यांच्या शेतामधील विहिरीत एक महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना सकाळी समजली असता त्यांनी घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक शिवभंज स्वामी, फौजदार शिवराज लोखंडे, बिट जमादार लिला जोगदंड यांनी शंकर हाके, उमेश चव्हाण या सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेतली. विहिरीतील महिलेचा म्रतदेह नागरिकांच्या मदतीने चारपाईच्या साहाय्याने पाण्याच्या बाहेर काढून शहरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
 मृत्यूचे कारण हत्या कि आत्महत्या? नेमके समजू शकलेले नसले तरी रुग्णालय परिसरात आलेल्या नातेवाईकांच्या माहितीवरून मागील अनेक दिवसापासून घरगुती वाद सुरू असल्याची चर्चा ऐकू येत होती. मृत महिलेस १० वर्षांचा एक मुलगा आहे. संध्याकाळ पर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.

संपादन - गणेश पिटेकर

loading image