esakal | आईसह सात वर्षांचा चिमुरडाही गेला पाण्यात वाहून, शोध कार्य सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) तालुक्यात ओढ्याच्या पाण्यात आई व मुलगा वाहून गेले.

आईसह सात वर्षांचा चिमुरडाही गेला पाण्यात वाहून, शोध कार्य सुरु

sakal_logo
By
दत्तात्रय शेगूकर

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील Aundha Nagnath कोंडसी (असोला) येथील ओढ्यातील पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने आई व मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी (ता.११) रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली. औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके (पोटा ) येथे Hingoli रामदास शेळके, वर्षा योगेश पडोळ, योगेश पडोळ व त्यांचा मुलगा श्रेयस हे चार जण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसीमार्गे (असोला) औरंगाबादला Aurangabad निघाले. यावेळी चालकाला (योगेश) ओढ्याला आलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही. या दरम्यान वर्षा पडोळ, श्रेयस पडोळ हा सात वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून गेले.hingoli breaking news mother, son flow into water in aundha nagnath tahsil

हेही वाचा: Hingoli Rain Updates : हिंगोल जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस

रामदास शेळके, चालक योगेश यातून बाहेर आले. त्यांनी ही माहिती असोला येथील गावकऱ्यांनी दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांना सांगितले. त्यानंतर पोलिस व गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. दरम्यान, तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलिस निरीक्षक मोरे वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षांच्या मुलाचा शोध घेत आहेत. रात्री उशीरापर्यत हे शोधकार्य सुरूच होते.

loading image