esakal | Hingoli Rain Updates : हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोलीत जोरदार पाऊस

Hingoli Rain Updates : हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात Hingoli सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.११) हिंगोली, कळमनुरी औंढा व वसमत तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस Rain झाला. जिल्ह्यात मागील चोवीस तासात सकाळी आठवाजेपर्यंत १३.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली तालुक्यात १३.६० मिलिमीटर पाऊस झाला. कळमनुरी Kalamnuri १९.७०, वसमत Vasmat १२.२०, औंढा नागनाथ Aundha Nagnath १३.३०, तर सेनगाव Sengaon तालुक्यात ९.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ३९.८२ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, तोंडापूर, भोसी, कुर्तडी, डोंगरकडा, सुकळी विर, जामगव्हाण, कुंभारवाडी, उमरदरा, येडशी, चूंचा, आखाडा बाळापुर, शेवाळा, डोंगरकडा, डोंगरगाव पुल, पोतरा, बोल्डा आदी गावांत दोन तास पाऊस झाला.hingoli rain updates heavy rain hit district

हेही वाचा: वैजापूर तालुक्यात अपघात, दोघा तरुणांचा मृत्यू

वसमत तालुक्यातील कुरुंदा, कोठारवाडी, गिरगाव आदी गावांत दीड तास पाऊस झाला. औंढा तालुक्यातील जवळाबाजार, शिरड, असोला, पुरजळ, खरंजाळा, बाराशीव आदी ठिकाणी पाऊस झाला. हिंगोली शहरासह तालुक्यातील सवड, नर्सी, खांबाळा, डिग्रस, अंधारवाडी, बासंबा, सीरसम, फाळेगाव आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतशिवारात पाणीच पाणी झाले होते. तर छोट्या मोठ्या ओढ्याना पाणी आले होते. शहरात सखल भागात देखील पावसाचे पाणी जमा झाले होते. हा पाऊस रात्री उशिरापर्यंत विजेच्या कडकडाटासह सुरू होता. पावसामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत.

loading image