esakal | हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के,भूगर्भातून आवाज
sakal

बोलून बातमी शोधा

भूकंप

हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के,भूगर्भातून आवाज

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली Earthquake in Hingoli जिल्ह्यात हिंगोली, वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांत रविवारी (ता.११) सकाळी साडेआठ वाजता जमीन हादरली. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे त्याच वेळी एकापाठोपाठ एक असे दोन आवाज झाले. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या आवाजाची यवतमाळ येथील भूकंपमापक यंत्रावर ४.४ रिश्टर स्केल नोंध झाली आहे. हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. औंढा व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांत असे आवाज झाले. या आवाजाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र गावकरी भयभीत झाले आहेत.hingoli breaking news slight earthquak in district

हेही वाचा: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला भरधाव पिकअपचा धक्का

जमीन हादरली असल्याचे गावकरी सांगत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या अनेक वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत आहेत. आतापर्यंत शंबर वेळेपेक्षा अधिह आवाज आले आहेत. काही ठिकाणी जमीन हादरल्याने शहरासह ग्रामीण भागातील सर्व गावकरी रस्त्यावर आले होते.जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे रोहित कंजे यांनी सांगितले, की हा जिल्ह्यातील भूकंपाचा सौम्य धक्का होता. त्याची यवतमाळ येथील भूकंपमाक यंत्रावर ४.४ रिश्टर स्केल नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नागरिकांना घाबरण्याचे काही काही नाही. स्वतःची काळजी घ्यावी. भूकंपाचा आवाज आल्यास नागरिकांनी घरामध्ये न थांबता बाहेर मोकळ्या जागेत थांबावे असे श्री.जयंवशी यांनी आवाहन केले.

loading image