Hingoli Breaking ; बावीस वर्षीय युवक पॉझिटिव्ह....

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

जिल्ह्यात सोमवारी रात्री साडेनऊ वाजता आलेल्या अहवालात कळमनुरी येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एका २२ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली आहे. तसेच वसमत येथील तीन तर हिंगोली येथील दोन रुग्णांना रुग्णालयातून घरी सुट्टी देण्यात आली.

हिंगोली ः जिल्ह्यात रविवारी रात्री वाढलेल्या सात रुग्णानंतर आतापर्यंत कोरोना रुग्णांनी द्विशतकाचा आकडा पार केला आहे. यातच सोमवारी रात्री साडेनऊ वाजता आलेल्या अहवालात कळमनुरी येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एका २२ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्याची एकूण संख्या २०१ झाली आहे. तर सोमवारी पाच जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली.   

जिल्ह्यात द्विशतकाचा आकडा पार
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांनी द्विशतकाचा आकडा पार केला असून त्यापैकी १६३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला जिल्हा रुग्णालयात ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वसमत कोरोना केअर सेंटर येथे भरती करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये हट्टा चार, गिरगाव दोन, अकोली एक, कुरुडवाडी एक, हयातनगर चार, कौठा एक, वसमत शहर एक, एकूण १४ रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात एकूण २२ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यात सुरेगाव एक, नागेशवाडी एक, पहेनी दोन, चोंढी खुर्द सहा, बाराशिव दोन, सेनगाव तीन, रिसाला तीन, नगर परिषद हिंगोली चार यांचा समावेश असून त्यांच्यावर वैद्यकीय पथकामार्फत उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - अनधिकृत वाळू वाहतूक सोडण्यासाठी चक्क तीस हजारांची लाच

९७ रुग्णांचे अहवाल अद्यापही प्रलंबित 
आयसोलेशन वॉर्ड व कोरोना सेंटर येथे आतापर्यंत दोन हजार ४८४ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार १३८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन हजार १९० रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली. सद्यस्थितीला २७५ व्यक्ती भरती असून, ९७ रुग्णांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

हेही वाचा - मुस्‍लिम मराठी साहित्य चळवळीचे ऑनलाइन कवी संमेलन

जांब गाव कंटेनमेंट झोन घोषित
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील जांब या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोमवारी (ता. आठ) जांब या गावाचे संपूर्ण क्षेत्र हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. 

कोरोना मीटर 
एकूण पॉझिटिव्ह - २०१ 
उपचार घेत घरी परतलेले - १६८ 
उपचार सुरु - ३३ 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli Breaking; Twenty-two year old youth positive hingoli news