
हिंगोली : ‘जात पडताळणीचे प्रस्ताव सादर द्या’
हिंगोली : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्षात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते.
वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये. यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेला नाही त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे.
त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज सादर करावेत. याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे, असे आवाहन हिंगोली येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे यांनी केले आहे.
Web Title: Hingoli Caste Verification Proposal Submit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..