esakal | हिंगोली : अवैध धंद्याला लगाम लावण्यास सेनगावच्या पोलिस निरीक्षकांसमोर आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेनगाव तालुक्यामध्ये अवैध व्यावसायिकांकडून मटका, जुगार, तितली भवरा, देशी व बनावट दारू खुलेआम सुरु असून तत्कालीन पोलिस निरीक्षकाला दिवाळी दरम्यान लगाम लावण्यात यश मिळाले होते.

हिंगोली : अवैध धंद्याला लगाम लावण्यास सेनगावच्या पोलिस निरीक्षकांसमोर आव्हान

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : तत्कालीन पोलिस निरीक्षकाच्या काळातील अनेक दिवसांपासून तालुक्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाला लगाम लावण्यास नूतन पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. मात्र तालुक्यातील कुठलेही अवैध धंदे सुरु होऊ देणार नाही. अशा धंद्यावाल्यानी आपले काळे कारनामे बंद करावे अन्यथा कडक कारवाईस सामोरे जावे असा सज्जड दम पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिला आहे.

सेनगाव तालुक्यामध्ये अवैध व्यावसायिकांकडून मटका, जुगार, तितली भवरा, देशी व बनावट दारू खुलेआम सुरु असून तत्कालीन पोलिस निरीक्षकाला दिवाळी दरम्यान लगाम लावण्यात यश मिळाले होते. परंतु दिवाळी सन संपताच अवैध व्यवसायिक पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे या अवैध धंद्याला लगाम लावण्यासाठी नव्याने रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यात खरीप पिकांची अंतीम पैसेवारी ४८.३५ टक्के

या अवैध धंद्यावर अंकुश बसवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील अशी आशा सामान्य नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे. सेनगावचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर यांची बदली होऊन हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील हे सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १२) डिसेंबर रुजू झाले आहेत. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेत कार्य केल्यामुळे तालुक्यातील अवैध व्यवसायिकांवर अंकुश बसेल अशी आशा आहे. शहरासह तालुक्यातील हत्ता, साखरा, जयपुर, पानकनेरगांव आदी भागांमध्ये जुगार, मटका, तितली भवरा व अवैध बनावट दारू हे धंदे खुलेआम सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. यांच्यावर अद्याप कठोर कार्यवाही झाली नसल्यामुळे त्यांचे धाडस अधिक वाढत चालले आहे. ग्रामीण भागामध्ये बनावट दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. 

शिवाय या दारूमुळे अनेकांच्या जीवित्वास धोका निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी मटका, तितली भवरा व जुगारामुळे तरुणांचे आयुष्य बरबाद होत असल्याचे पहायला मिळत आहे. यावर्षी अतिवृष्टिमुळे शेत मालाचे मोठे नुकसान झाल्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असतानाच या अवैध व्यवसायिकांकडून नव्या पिढीला वाम मार्गाला काम दिवसा ढव्हळ्या सुरु असल्याचे चित्र आहे. या अवैध धंद्याला लगाम लावण्यास नूतन पोलिस पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटिल यांना यश मिळेल की नाही असा प्रश्न आता सामान्य नागरिकांतुन उपस्थित केला जात आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे