Hingoli : चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज हिंगोली दाैरा

उपस्थितीचे आवाहन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केले आहे
chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankulesakal

हिंगोली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या संघटन बांधणीसाठी सोमवारी (ता. १२) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.सकाळी ९ ते १० समन्वय बैठक विभाग संघचालक यांचे निवासस्थान, १० ते ११ पत्रकारांसोबत चहापान, ११ ते ११.३० दुचाकी फेरी, ११.३० ते २ संघटनात्मक मेळावा मधुरदीप पॅलेस येथे, दुपारी दोन ते तीन राखीव, तीन ते ३.३० सोशल मीडिया बैठक, ३.३० ते ४.३० कोअर कमिटी व मंडळ अध्यक्ष बैठक ४.३० ते ०५ युवा वॉरियस शाखा उद्‍घाटन, पाच ते ५.३० धन्यवाद मोदीजी अनुषंगाने दोन लाभार्थींच्या घरी जाऊन लाभार्थींकडून पत्र लिहून घेतील,

५.३० ते ०६ अठरा वर्षे नवीन मतदार नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष दोन मतदारांकडून फॉर्म भरून घेतील, ६ ते सातपर्यंत सामाजिक कार्यक्रम (बैठक) गवळी समाज व मातंग समाज, ७ ते ७.३० फ्रेंड्स ऑफ बीजेपी, ७.३० वाजता औंढ्याकडे प्रयाण, रात्री ८ ते ९ औंढा नागनाथ येथे बूथ समिती बैठक, रात्री ९ वाजता परभणीकडे ते रवाना होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com