हिंगोलीत ‘व्हॉट्ॲप’च्या माध्यमातून बालकांना मिळतेय कृतीयुक्त शिक्षण

hingoli photo
hingoli photo

हिंगोली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र बंद आहेत. या कालावधीत याबालकांना घरपोच आहार वाटप करण्यात येत आहे. परंतु, त्‍यांना घरातच गुंतवून ठेवण्यासाठी कृतीशिल उपक्रमातून घरीच शिक्षण देणे सुरू झाले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पालकाचा व्हाट्ॲप ग्रुप तयार करून त्‍या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे सर्वच अंगणवाडी केंद्र बंद आहेत. परंतु, जिल्‍ह्यात अंगणवाडी सेविका तीन वर्षापर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी करत आहेत. अंगणवाडी केंद्र बंद असले तरी बालकांना आहार मिळत आहे. 

बालकांना घरात गुंतवून ठेवणे गरजेचे
 
परंतु, ते घरात बसण्यासाठी कशात तरी गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. म्हणून एकात्‍मिक बालविकास योजनेचे आयुक्त यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कृतीशील उपक्रमातुन घरीच शिक्षण देणे सुरू केले आहे. 

अनुभवातून मिळतेय शिक्षण 

यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पालकांचा व्हाट्ॲप ग्रुप तयार करून दररोज वेगवेगळ्या शैक्षणिक कृती करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. बालक आपल्या भोवतालच्या साहित्याचा उपयोग करुन अनुभवातून शिक्षण घेत आहेत. यामध्ये विविध रंग ओळखणे, गणना करणे, आकार समजणे, आवाज समजणे, चित्र काढणे या सारख्या उपक्रमातुन शिक्षण घेत आहेत.

बालकांची तपासणीही होतेय

 या उपक्रमामुळे बालक दिवसभर उपक्रमात गुंतत असल्याने पालक वर्ग खुष आहे. दरम्यान, अंगणवाडी सेविका बालकांची तपासणी, घरपोच आहार वाटप, जनजागृती सोबतच शैक्षणिक उपक्रम राबवत असुन अतिशय महत्वपूर्ण काम करत आहेत. 

पालकांतून होतेय कौतूक

त्यामुळे महिला बाल कल्याण विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस पुढाकार घेत आहेत.

पालकांचा व्हॉट्ॲप ग्रुप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनमुळे जिल्‍ह्यातील अंगणवाडी केंद्र बंद आहेत. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका यांनी पालकांचा व्हॉट्ॲप ग्रुप तयार करून बालकांना घरीच शिक्षण देणे सुरू केले आहे.
-गणेश वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com