हिंगोली : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, आंबा पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli Climate change heavy Rain wind farmers mango loss

हिंगोली : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, आंबा पिकांचे नुकसान

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी ता. १९ सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कळमनुरी तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह एक तास पाऊस झाला. तसेच वसमत तालुक्यातील काही गावात हलका पाऊस झाला. या पावसामुळे आंबा पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात मागच्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. अधुनमधुन पाऊस देखील पडत आहे. आतापर्यंत तीन वेळेस जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने ऊन्हा पासून नागरिकांची सुटका झाली आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजता कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर, वारंगा फाटा, डोंगरगाव, कामठा आदी भागात वाऱ्यासह एक तास पाऊस झाला. तर कळमनुरी तालुक्यातील पोतरा, कवडा, बोल्डा, सिंदगी, येहळेगाव गवळी, असोला तसेच वसमत तालुक्यातील गिरगाव, कौठा, कुरुंदा आदी ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र सकाळी अकरा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. कळमनुरी तालुक्यातील काही गावात झालेल्या वाऱ्यासह पावसाने आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने गुरुवारी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.