esakal | हिंगोली : नर्सी येथे आढळला कॉमन ट्री फ्रॉग दुर्मिळ बेडूक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या बेडकाबाबत प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. राजकुमार पवार यांनी सांगितले की, झाडावरील बेडकाची प्रथम १८३० मध्ये जाँन अँडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली.

 

हिंगोली : नर्सी येथे आढळला कॉमन ट्री फ्रॉग दुर्मिळ बेडूक

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी कोकण परिसरात आढळणारा व मराठवाड्यात क्वचितच आढळून येणारा इंडीयन काँमन ट्री फ्रॉग (पाँलीपेडेटस् मँकुलँटस) प्रजातीचा दुर्मिळ बेडूक बापूराव इंगोले यांच्या घराच्या छतावर आढळून आला.

या बेडकाबाबत प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. राजकुमार पवार यांनी सांगितले की, झाडावरील बेडकाची प्रथम १८३० मध्ये जाँन अँडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच आपल्या प्रदेशातील कोकणात आंबोली परिसरात दिसतो, तर मराठवाड्यात क्वचितच पाहायला मिळतो या बेडकाला 'चुनाम या नावाने ही ओळखले जाते. तर संस्कृतमध्ये 'चुर्ण असे म्हटले जाते.

हेही वाचा हिंगोलीत लोकअदालतीत ५७ प्रकरणे निकाली, तीन कोटी ४१ लाख २ हजार ११६ रुपयाची तडजोड

भिंतीवर देखील हा बेडूक दिसतो जंगलात किंवा एखाद्या ठिकाणी झाड आणि ओलावा असेल तर गावातही हे बेडूक येतात. विशेष करून आंबोली तालुक्यात उडता बेडूक आढळतो. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झालेला असतो. बेडकांच्या पायावर आतील बाजूस गडद रंगाचे पट्टे असतात. ते बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात. या भडक रंगाचा वापर करून बेडूक आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वत:चा बचाव करतात झाडावरच्या बेडकाची शक्ती लांब उड्या मारण्यातच सामावलेली असते असे श्री. पवार म्हणाले.


बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे.हा बेडूक विशेषता कोकण परिसरात जास्त दिसून येतो याला चुनाम असेही म्हणतात ,हा तामिळ शब्द आहे.
हा भिंतीवर तसेच जंगलात ही मोठ्या प्रमाणात दिसतात किटक,किडे,हे याचे खाद्य असून हा बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

- प्रा. डॉ.राजकुमार पवार, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image