
जिल्ह्यात केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मदतीने जेष्ठ नागरिक, इतर नागरिकांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने ई- संजीवनी अँपद्वारे घरबसल्या आरोग्य सल्ला सेवा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना संसर्ग काळात नागरिक रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करीत होते.
हिंगोली : कोरोना संशयितांना तातडीने आरोग्य सल्ला उपलब्ध व्हावा यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने हा उपक्रम सुरू केला असून, ई संजीवनी अँपद्वारे व्हिडीओ कॉलिंग तर चॅटींग ही करता येणार असल्याने रुग्णांना घरबसल्या एका क्लिकवर माहिती मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.
जिल्ह्यात केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मदतीने जेष्ठ नागरिक, इतर नागरिकांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने ई- संजीवनी अँपद्वारे घरबसल्या आरोग्य सल्ला सेवा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना संसर्ग काळात नागरिक रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करीत होते.अनेक जण अंगावर दुखणे काढत आहेत.त्यामुळे आजार गंभीर होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असते.हा प्रकार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने ई-ओपीडी विकसित केली आहे.ही ओपीडी सकाळी ९.३०ते १.३० व दुपारी तीन ते पाच यावेळेत सुरु राहणार आहे. रविवारी मात्र बंद राहील असे डॉ.पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - नांदेड : शेतकऱ्याला अन्य पिकाच्या तुलनेत “करडई” पिकाचे उत्पन्न लाभदायक -
मोबाईलच्या माध्यमातून या ई-ओपीडीचा लाभ घेता येणार आहे.संबंधितांना ओटीपीचा वापर करून मोबाईलवर व्हेरिफिकशन करावे लागेल.त्यानंतर रुग्णासाठी असलेला नोंदणी फॉर्म भरून टोकन साठी विनंती पाठवावी लागेल.आदिपासून आजार असतील तर त्याची माहिती दिल्यानंतर
एसएमएसच्या माध्यमातून पेशन्ट आयडी व टोकन मिळणार आहे.एसएमएस आल्यानंतर पेशन्ट आयडी सह लॉगिन करावे,प्रतिक्षालय ओपशन आल्यानंतर थोड्या वेळात कॉल नाऊबटन ऍक्टिव्हेट होईल.व्हिडीओ कॉल सुरु झाल्यानंतर स्क्रीनवर डॉक्टर येतील.सदर डॉक्टर आरोग्य विषयक माहिती देऊन ई प्रिस्क्रीपशन द्वारे औषधी व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देतील. औषधपत्र डाऊनलोड केल्यानंतर डॉक्टरा मार्फत देण्यात आलेली औषधी इ प्रिस्क्रीपशन पेपर दाखवून नजीकच्या सरकारी दवाखान्यातून औषधी खरेदीचा मार्ग मोकळा होईल.ही मोफत सेवा असून यांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे