व्हाॅट्सअप ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करणे पडले महागात,दोघांवर गुन्हा | Hingoli Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp
व्हाॅट्सअप ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करणे पडले महागात,दोघांवर गुन्हा

व्हाॅट्सअप ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करणे पडले महागात,दोघांवर गुन्हा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : व्हाॅट्सअप (WhatsApp) ग्रुपवर जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज फॉरवर्ड करणे महागात पडले असून गोरेगाव पोलीस ठाण्यात रविवारी (ता.१४) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी वेळोवेळी आवाहन करित आहेत. तरीही शनिवारी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माझोड येथील रेणुका माता मित्र मंडळ व्हाॅट्सअप ग्रुपवर ग्रुप मेंबर महावीर वराडे (रा. रामाकृष्णा सिटी, हिंगोली), रमेश मुळे (रा.माझोड) यांनी वादग्रस्त, जातीय तेढ निर्माण करणारे संदेश पाठवले होते. सदरची बाब सायबर पोलिस स्टेशन हिंगोली यांच्या निदर्शनास आल्यानंतर सदर वादग्रस्त पोस्ट करणारे महावीर वराडे यांना हिंगोलीतून ताब्यात घेण्यात आले. तसेच रमेश मुळे यांना माझोड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध गोरेगाव पोलीस स्टेशन (Hingoli) येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान हिंगोली पोलीसाद्वारे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की कोणीही सोशल मीडियाद्वारे व्हाॅट्सअप ,फेसबुक व इंस्टाग्राम समाजात अशांतता निर्माण करणारे, कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे जातीय तेढ निर्माण करणारे फोटो, व्हिडिओ , मेसेज कुणी प्रसारित करू नये. सायबर पोलीस स्टेशन हिंगोली आपल्या सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतिष देशमुख, पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी केली.

loading image
go to top