esakal | हिंगोली : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढणार - एसपी राकेश कलासागर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्य शासनाने राज्यातील २२ पोलीस अधीक्षक,पोलीस उपाआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश मागील आठवड्यात काढले होते

हिंगोली : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढणार - एसपी राकेश कलासागर

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, गुटखा आदी बंद करण्याचे तगडे आवाहन नूतन पोलिस अधीक्षक यांच्यासमोर उभे आहे. राकेश कलासागर यांनी योगेशकुमार यांच्याकडून हिंगोली पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेतला. यावेळी जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढून कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ देणार नाही. गुन्हेगारांनी एक तर आपले कारनामे थांबवावेत अन्यथा जिल्हा सोडावा असा सज्जड इशारा श्री. कलासागर यांनी दिला आहे.  

राज्य शासनाने राज्यातील २२ पोलीस अधीक्षक, पोलीस उपाआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश मागील आठवड्यात काढले होते. शुक्रवारी (ता.२५) उशिराने नूतन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पदभार घेतला आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी त्यांच्याकडे पदभार सोपविला आहे.

हेही वाचा - आमदार श्यामसुंदर शिंदे कोरोना बाधित, मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल -

योगेशकुमार पदस्थापनेच्या वेटिंगवर

हिंगोली येथील पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांची बदली झाली असून, त्यांच्या रिक्त जागी मुंबई येथील राज्य गुन्हे अन्वेशन तांत्रिक सेवा विभागाचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पदभार घेतला आहे. आता त्यांच्यासोर जिल्ह्यातील अवैध्य धंदे ,शासनाने बंद केलेला गुटखा चोरी छुप्या मार्गाने जोरात विक्री सुरू आहे. तर वाढती गुन्हेगारी, चोऱ्यांचे प्रमाण सुरु असून, अवैध दारू विक्री आदी प्रकार रोखण्यासाठी नूतन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या समोर मोठे आव्हान आहे. 

येथे क्लिक कराखासदार हेमंत पाटील यांनी घेतली केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री यांची भेट, काय आहे प्रकरण

गुन्हेगारीवर कसे नियंत्रण मिळवितील याकडे जिल्ह्याचे लक्ष 

तत्कालीन पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या काळात देखील खुलेआम गुटखा, चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यांनी यावर अंकुश ठेवण्याचे काम चोख केले मात्र चोरी छुप्या मार्गाने हे व्यवसाय सुरू होते. अनेक वेळा पोलिसांनी धाडी टाकून गुन्हेगारावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक देखील केली आहे. जिल्ह्यात अवैथ गुटखा विक्री फोफावल्याचे चित्र आहे. नूतन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे कसे हाताळतात यावर अवलंबून आहे. दरम्यान, जिल्ह्यात या सर्व प्रकारावर नूतन पोलिस अधीक्षक कसा अंकुश ठेवणार आहेत याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top