हिंगोली : कृषी योजनेच्या लाभासाठी ३१ डिसेंबर अखेरची डेडलाईन

राजेश दारव्हेकर
Saturday, 19 December 2020

कृषी जिल्हा परिषदेच्या कृषी डॉ.बाबासाहेब विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या स्वालंबन उपरोक्त दोन्ही योजनेच्या अर्जास प्रारंभ झाला आहे. 

हिंगोली : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना नविन विहीर व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना नविन विहीर व इतर शेती उपयोगी साहित्याच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली प्रक्रिया आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत सदर डेटलाईन देण्यात आली आहे.

कृषी जिल्हा परिषदेच्या कृषी डॉ. बाबासाहेब विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या स्वालंबन उपरोक्त दोन्ही योजनेच्या अर्जास प्रारंभ झाला आहे. सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देवून अनुसूचित जाती व जमातीच्या घटकातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी राष्ट्रीय कृषी योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविली जाते. यंदा करोनामुळेही योजनाची अमंलबजावणी लांबणीवर पडली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यानंतर ही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आँनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. यासह आवश्यक कागदपत्रे महाडीबीडी संकेत स्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा हिंगोली : आखाडा बाळापूर परिसरातील जिल्हा परिषदेच्या बंद शाळाही झाल्या बोलक्या

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजनेला यंदा स्थगीती देण्यात आली आहे. इतरयोजना सुरू होत असताना ही योजना सुरू करावी अशी मागणी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांतून केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याच हालचाली नसल्याने ही योजना यंदा अंधातरी असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेंतर्गत नविन विहीरीसाठी अडीच लाखापर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी किमान ०.४० हेक्टर ते ६ हेक्टरपर्यंत जमिन असणे बंधनकारक आहे. तसेच लाभार्थ्यांचे वार्षीक उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे याशिवाय इतर आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी लागणार आहेत. गतवर्षी केवळ अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. यंदा व्याप्ती वाढविल्याने अनु.जमातीच्या शेतकन्यांनाही लाभ मिळणार आहे.

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Deadline till 31st December for the benefit of Krishi Yojana hingoli news