हिंगोली आगाराला मालवाहतूकीतून मिळाले ५२ हजाराचे उत्पन्न

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतच असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ता. २५ एप्रिलपासून संचारबंदी लागु केली आहे.
मालवाहतुक
मालवाहतुक
Updated on

हिंगोली : कोरोना वाढता प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे (Lockdown) प्रवासी बसेस बंद आहेत. शासनाने माल वाहतुकीस परवानगी दिल्यामुळे एसटी महामंडळाची (St mahamandal) माल वाहतूक सेवा केवळ सुरु आहे. दहा ते बारा दिवसात एसटी महामंडळास माल वाहतुकीतून ४१ हजार ८९० रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती वाहतूक प्रल्हाद बरडे यांनी दिली. (Hingoli depot got revenue of Rs. 52 thousand from freight)

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतच असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ता. २५ एप्रिलपासून संचारबंदी लागु केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने प्रवासी वाहतूक बंद आहे. तेंव्हापासून आजपर्यंत हिंगोली आगाराची एकही बस धावली नाही.

हेही वाचा - पगारवाढीव्यतिरिक्त आणखी बरेच काही

शासन आदेशानुसार २५ कर्मचारी कामावर आहेत. ज्याना बोलावले तेच कर्मचारी कामावर आहेत. दरम्यान ता. २६ एप्रिल रोजी हिंगोली परभणी मालवाहू बस सोडण्यात आली. या बसला भाड्यापोटी तीन हजार ७५० उत्पन्न मिळाले. या बसमध्ये सरकीची वाहतूक करण्यात आली. हिंगोली ते नांदेड हळद वाहतूकीतुन चार हजार २५० रुपये भाडे मिळाले आहे. मे महिन्यात हिंगोली बीड अंगणवाडीचा खाऊबद्दल भाड्यातुन आठ हजार ३९० रुपये भाडे मिळाले. हिंगोली ते नांदेड हळद वाहतूक भाडे दोन वेळेस आठ हजार ३०० हिंगोली ते अकोला हरभरा वाहतूक पाच हजार ५००, हिंगोली ते नांदेड चार हजार १५० हळद वाहतूक भाडे, हिंगोली ते परभणी सरकी ढेप भाडे तीन हजार ७५०, हिंगोली ते अकोला हळद वाहतूक भाडे पाच हजार ५०० असे एकूण ४१ हजार ८९० रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले असल्याचे श्री. बरडे यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com