हिंगोली : ऑनलाईन अभ्यासक्रमाला विस्कळीत वीज पुरवठ्याचा अडथळा

चंद्रमुणी बलखंडे
Saturday, 3 October 2020

राज्यभरासह देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबधित रुग्णाचा बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी बाधित रुग्णही वाढत आहेत. कोरोनामुळे जीवनपद्धती बदलली असून प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेत आहे.

आखाडा बाळापूर (जिल्हा हिंगोली) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच शाळा ऑनलाईन अभ्यासक्रमाला पसंती देत आहेत. मात्र सततचा विस्कळीत वीज पुरवठा अडथळा ठरत असून विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत आहे. साळवा ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत गावामध्ये वीजपुरवठा तर नावालाच आहे.

राज्यभरासह देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी बाधित रुग्णही वाढत आहेत. कोरोनामुळे जीवनपद्धती बदलली असून प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेत आहे. शासनही नागरिकांच्या आरोग्याचा काळजी घेत आहे. विविध उपक्रम राबविले जात आहेत. सध्या शासकीय कार्यालय, बस, प्रवसी वाहने सुरू असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. लहान बालके व वयोवृद्ध व्यक्तींना कोरोना आजार लवकर होत असल्याचे जाणकार सांगत आहेत. त्याअनुषंगाने शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणीना सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही.

हेही वाचा( Video )- हिंगोलीत पहिल्यांदाच कोरोना बाधीत रुग्णावर यशस्वी डायलिसिस

विद्यार्थ्यांना अँड्रॉईड मोबाईल घेण्याच्या सूचना

मात्र ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश शाळा, महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अँड्रॉईड मोबाईल घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक पालकांनी ऐपत नसताना पाल्याचे भवितव्य लक्षात घेता अँड्रॉईड मोबाईल घेतले आहेत. यावर दररोज अभ्यासक्र शिकवले जात आहे. सुरवातीला काही दिवस सुरळीत चाललेला अभ्यासात खंड पडत आहे. वारंवार वीज पुरवठा विस्कळीत होत असल्याने मोबाईल चार्जिंग होण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.

येथे क्लिक करामातृभाषेच्या जडणघडणीत व्याकरणाचा पाया भक्कम असणे आवश्यक- देवीदास फुलारी

या गावामध्ये दिवसभरात वीजपुरवठा क्वचितच

एकाच मोबाईलवर दोन- दोन पाल्याचा अभ्यास चालत असल्याने मोबाईल लवकर डिस्चार्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात वीज कंपनीकडून अघोषित भारनियमन केले जात आहे. अर्धा तासाला वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. साळवा ३३ के व्ही वीज उपकेंद्रांतर्गत गावामधील पालक, विद्यार्थी तर त्रस्त झाले आहेत. या गावामध्ये दिवसभरात वीजपुरवठा क्वचितच असतो. परिणामी मोबाईल बंदच राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांना मुकावे लागत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Disruption of power supply to online course hingoli news