दिलासादायक : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येसोबतच मृत्यूदरही घटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना व्हायरस

दिलासादायक : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येसोबतच मृत्यूदरही घटला

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांची (Corona virus) सतत वाढत होती दोनशेहून अधिक रुग्ण (Hingoli ) व दररोज दहापेक्षा अधिक मृत्यूदर होता. मागच्या काही दिवसापासून त्याचे प्रमाण घटले आहे. आता शंभराच्या आत रुग्ण तर पाचपेक्षा कमी मृत्यू दराचा आकडा झाल्याने तो जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. (Hingoli- district- along with- the- number- of corona patients- the death- rate- also -decreased)

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची साखळी चांगलीच घट्ट झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार १२२ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १४ हजार २७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध कोरोना सेंटरमध्ये ५२२ रुग्णावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. दररोज बाधित रुग्णांचा दोनशेच्या वर गेलेला आकडा शंभराच्या आत आला तसेच मृत्यूदर देखील बारा ते पंधरावरुन एक ते पाचपर्यंत आला आहे. सोमवार ता. १७ रुग्ण संख्या ६२, मृत्यू एक, ता. १८ रुग्ण ९५, मृत्यू तीन, ता. १९ रुग्ण ५९, मृत्यू चार, ता. २० रुग्ण ७३, मृत्यू तीन रुग्णांचा समावेश आहे. हा संपूर्ण आठवडा दिलासादायक ठरला आहे.

हेही वाचा - किरीट सोमय्या यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ब्रेक द चेन, लाँकडाऊन या नियमाचे तंतोतंत पालन, लसीकरण मोहीम, कोरोना चाचण्या वाढवून बाधितावर उपचार यामुळे कोरोना रुग्ण संख्या घटली आहे. जिल्ह्यात कोरोनाची वाढलेली साखळी तोडण्यास यश आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार १२२ बाधित रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १४ हजार २७३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत ५२५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत ३२४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top